Crop Insurance: जिल्ह्यातील 12 हजार 508 शेतकऱ्यांनी ई -केवायसी चे प्रमाणिकरण केलेले नसल्यामुळे शासन स्तरावरुन अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.
त्यासाठी गावस्तरावरील तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक यांच्यामार्फत ई- केवायसी करण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न करण्यात आलेले होते. तरी देखील अदयापही शेतकऱ्यांनी e-KYC न केल्यामुळे शेतकरी अनुदानाच्या पासून वंचीत आहेत. त्या सर्वांनी ई -केवायसी करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलेले आहे.
जळगाव जिल्ह्यातील सन 2022 पासून शेतीपिकाच्या नुकसानीचे अनुदान वितरित करण्यासाठी वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे. त्यानुसार 2 लाख 13 हजार 416 शेतकऱ्यांना शासनस्तरावरुन डीबीटी प्रणालीद्वारे जवळपास 244 कोटी अनुदान वाटप करण्यात आले आहेत.
लाडकी बहीण योजना सुधारित शासन निर्णय आणि नवीन घोषणा पहा
मात्र जिल्ह्यातील 12 हजार 508 शेतकऱ्यांनी ई – केवायसी चे प्रमाणिकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरुन अनुदान मंजूर झाले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यासाठी गावस्तरावरील तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक यांचेमार्फत ई – केवायसी करण्यासाठी यापूर्वी प्रयत्न करण्यात आलेले आहे. तरी देखील अद्यापही काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी ई – केवायसी न केल्यामुळे अनुदानापासून वंचीत आहे. ( Crop Insurance )
Nuksan bharpai ekyc विशेषत: माहे जानेवारी 2024 ते माहे मे 2024 या कालावधित जिल्ह्यातील भडगाव, मुक्ताईनगर, पारोळा , अमळनेर व जामनेर या तालुक्यात अवेळी पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानपोटी 5 हजार 854 शेतकऱ्यांनी ई- केवायसी प्रमाणीकरण केलेली नसल्यामुळे शासन स्तरावरून अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करता आलेले नाहीत. ( Crop Insurance )
झेरॉक्स व शिलाई मशीन 100 टक्के अनुदानावर मिळवा! ऑनलाईन अर्ज सुरु (
तरी संबंधित शेतकऱ्यांनी सी एस सी केंद्र व महा ई सेवा केंद्र येथे जाऊन ई – केवायसी करावेत व आपले शेतपिकाच्या नुकसानीचे अनुदान त्वरीत प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन सर्व संबंधित शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या वतीने करण्यात येते आहे.