Eknath Shinde will resign as Chief Minister today
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतलेला आहे, तो मान्य असेल, असं म्हणत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतलेली आहेत. यामुळे महायुतीच्या सत्तास्थापनेच्या वाटपात राज्यातील मुख्यमंत्रीपद भाजपच्या वाट्याल जाणार आहेत. त्यामुळे, शिवसेना व राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद व इतर महत्त्वाची खाती देण्यात येतीन, असं समीकरण सध्या पाहायला मिळत आहेत.
एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे सध्या स्पष्ट झालेले आहे. आता मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात पहिलं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचचं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.
शरद पवार – “मी गप्प बसणार नाही”, पराभवानंतर जाहीर केली पुढील रणनीती! पहा सविस्तर
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार?
एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर ते आता राज्याच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही, अशी माहिती समोर येत आहेत. शिंदेंचे निकटवर्तीय असलेले आमदार संजय शिरसाट यांनी याबाबत माहिती दिलीय आहे.
एकनाथ शिंदे कदाचित मुख्यमंत्रिपदही स्वीकारणार नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहेत, असं शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट म्हणालेले आहे.
लाडकी बहीण योजना…अन्यथा 2100 रूपये मिळणार नाहीत; लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट
एकनाथ शिंदे कदाचित उपमुख्यमंत्री बनणार नाहीत. मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने पुन्हा उपमुख्यमंत्रिपदावर जाणे योग्य नाहीत. शिवसेना दुसऱ्या नेत्याला उपमुख्यमंत्री करण्यास सांगेन. एकनाथ शिंदे यांना सोडून शिवसेनेतील इतर कोणत्याही नेत्याला उपमुख्यमंत्रिपदाची संधी देण्यात येईल, असंही शिरसाट यांनी म्हणाले आहे.