Kapus Soybean Anudan Vatap ; कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली असून, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काल खरीप हंगाम २०२३ मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक ६५ लाख शेतकऱ्यांना २,५०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित होणार असल्याचे कृषीमंत्री यांनी जाहीर केलेले होते. विशेष म्हणजे त्या घोषणे प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात आज पासून ३०/सप्टेंबर/२०२४ रोजी पासून शेतकऱ्यांच्या खात्यात १०, ००० रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत म्हणून ९६ लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी आधार लिंक असलेल्या ६८ लाख शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरु झालेले आहेत. या अनुदानामध्ये प्रति हेक्टरी ५०००/रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत १०,०००/- रुपये अनुदान देण्यात येणार आहेत. पात्र शेतकऱ्यांपैकी ६५/ लाख शेतकऱ्यांना आज २,५०० कोटी रुपये वितरित करणे सुरु आहेत. या अनुदानामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल असं राज्य सरकारचे उद्दिष्ट आहेत. तसेच त्यांच्या शेतीच्या कामासाठी व वैयक्तिक गरजा भागविण्यासाठी मोठी मदत होईन.
: 1 ऑक्टोबरपासून या नियमांमध्ये होणार बदल! तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार? पहा
२०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये प्रमाणे २ हेक्टरच्या मर्यादेत विशेष अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आलेला आहे. ऑनलाईन पद्धतीने तात्काळ हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये २३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात आले आहे.
राज्यातील एकूण सुमारे ९६ लाख खातेदार या योजनेतून लाभासाठी पात्र असून, आधार संलग्न माहिती व अन्य प्रक्रिया पूर्ण होतील, तसे टप्प्याटप्प्याने उर्वरित शेतकरी बांधवांना देखील लाभ वितरित केला जाईल.