Ladki Bahin New Rule गेल्या चार महिन्यांपासून लाडकी बहिण योजना समाजात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलेली आहे. या कालावधीत या योजनेत सरकारने अनेक महत्त्वाचे बदल केलेले आहे. नुकतेच, योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर दोन नवीन बदल जाहीर करण्यात आलेले आहे. या बदलांबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
पहिला बदल: इतर योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांसाठी अट
लाडकी बहिण योजनेच्या शासन निर्णयानुसार (GR), जर एखादी महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असल्यास, तिला या योजनेचा लाभ मिळणार नाहीत.
विशेषता संजय गांधी निराधार योजना लाभार्थी महिलांसाठी नवीन अटी लागू करण्यात आल्या आहे.
- ज्या महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहे. त्यांच्या नावासमोर संकेतस्थळावर (YES) असा उल्लेख केला जातो आहे.
- ज्या महिला योजनेचा लाभ घेत नाहीत, त्यांच्या नावासमोर (NO) असा पर्याय दिसतो आहे.
- याशिवाय, संजय गांधी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळणे थांबणार आहेत. इतकेच नव्हे, तर त्या महिलांनी आधी घेतलेला लाभ सरकारकडून परत वसूल केला जाण्याची शक्यता आहेत.
हे पण वाचा :- लाडकी बहीण योजना; घरात या 5 वस्तू असतील, तर महिलांना 6 वा हप्ता मिळणार नाही. नवीन नियम पहा
Ladki Bahin New Rule 2024
दुसरा बदल: आर्थिक लाभाची तपशीलवार माहिती पहा
आता लाडकी बहिण योजनेच्या संकेतस्थळावर महिलांना त्यांच्या आर्थिक लाभाची संपूर्ण माहिती उपलब्ध होईन. त्यामध्ये खालील गोष्टी समाविष्ट असतीन:
- आतापर्यंत योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम.
- ही रक्कम कोणत्या बँकेत जमा झाली आहे.
- पैसे जमा होण्याची तारीख.
- या बदलांमुळे लाभार्थींना त्यांचा आर्थिक हिशोब अधिक पारदर्शकपणे पाहता येईल.
संकेतस्थळावरील मर्यादा
हे दोन्ही बदल फक्त लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज केलेल्या महिलांसाठीच लागू आहे. नारी शक्ती धुत या मोबाईल एप्लिकेशनवर सध्या असे कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.