मित्रांनो निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेचे बाबतीत एक नवीन बातमी पुढे आलेली आहे. यानुसार लाडकी बहिणी योजनेमध्ये खोटी कागदपत्राचा वापर करून ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे. अशा सर्व महिलांकडून पैसे वसूल करण्यात येणार आहेत. अशा प्रकारची माहिती येत आहे. त्यानुसार ज्या महिलांनी बोगस कागदपत्रे वापरून लाभ मिळवलेल्या अशा महिलांच्या अर्जाची तपासणी निवडणुकीनंतर केली जाणार असून त्यानंतर त्यांच्याकडे पैसे देखील वसूल केले जाऊ शकतात.
लडकी बहीण योजनेचे नियम डावलून ज्या महिलांनी या योजनेचा लाभ मिळवलेला आहे. अशा सर्व महिलांची अर्जाची तपासणी ही डिसेंबर नंतर होणार आहे. अशा प्रकारची माहिती सध्या सर्व सोशल मीडियावर पसरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक महिला या बोगस कागदपत्र वापरून पैसे मिळवत असल्याची माहिती देखील पुढे आलेली आहे. त्यामुळे सरकारने लाडकी बहिणी योजनेच्या अर्जाची तपासणी ही डिसेंबरमध्ये म्हणजेच की निवडणुकीनंतर करण्याचे निर्णय घेतलेला आहे.
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,
लडकी बहिण योजनेचे नियम
- लाभार्थी व्यक्तीचे वय हे 21 वर्षे ते 65 वर्ष दरम्यान असावे.
- वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत मध्ये असणे आवश्यक आहे. अडीच लाखांवरील उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- या अगोदर सरकारच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नसावा. म्हणजेच की लाभ घेणारी महिला या अगोदर सरकारचे कोणतेही दुसऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना असून याच्या माध्यमातून योजनेचा अटी नियम मोडून जर कोणी लाभ घेतलेला असेल तर, अशा महिलांना अर्जाची तपासणी करून पैसे देखील परत करावे लागू शकतात.
मागे एका एका तरुणाने महिलांचे नावाने खूप मोठ्या प्रमाणावर लाडकि बहिण योजनेच्या माध्यमातून खुप मोठ्या प्रमाणात पैसे उकाळ्याचे देखील समोर आलेले आहे. तसेच मोठ्या घरामधील महिला देखील लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी झाल्याचे पाहायला मिळत आहेत त्यामुळे तपासणी करण्यात येऊ शकते.