Ladki Bahin Yojana : नमस्कार राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महिलांच्या मतदानाचा टक्का लक्षणीयरीत्या वाढलेला आणि महायुतीच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. यामागे लाडकी बहिण योजना हा महत्त्वाचा घटक ठरल्याचे बोलले जात आहेत. या योजनेच्या निकषांमध्ये काही बदल होण्याची शक्यता वर्तवलेली आहे.
योजनेचा विधानसभा विजयात मोठा वाटा
भाजप-महायुतीच्या अभूतपूर्व यशात लाडकी बहिण योजना महत्त्वाची ठरलेली आहे. निवडणुकीपूर्वी राज्यातील 2 कोटींहून अधिक महिलांच्या बँक खात्यात 5 महिन्यांची आर्थिक मदत जमा करण्यात आलेली आहे, ज्यामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या बाजूने मतदान केलेलं आहे.
जंगलात वनरक्षक आणि वाघ समोरासमोर; वनरक्षकांचा व्हिडिओ तुफान व्हायरल! काय झालं पहा
महायुती सरकारची भूमिका
महाविकास आघाडीच्या प्रचारादरम्यान, महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यास ही योजना बंद होणार, असे भाकीत करण्यात आलेले होते. निवडणूक जिंकल्यानंतर महायुती सरकारने ही योजना सुरुच ठेवणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे.
निकषांमध्ये संभाव्य बदल पहा
सध्याच्या स्वरूपात योजना चालू ठेवली जाणार असली तरी काही बदल होण्याची शक्यता आहेत. सध्या योजनेअंतर्गत 1500 रुपये प्रतिमाह दिले जातात. परंतु या रकमेतील वाढ लगेच होणार नाहीत.
महत्त्वाचे बदल अपेक्षित काय
1) सध्या एका कुटुंबातील कितीही महिलांना योजनेचा लाभ मिळतो. परंतु लवकरच एका कुटुंबातील फक्त 2 महिलांनाच लाभ घेता येईल, असा नियम लागू केला जाणार आहे.
2) राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही मर्यादा लागू केल्या जाणार आहेत.
Ladki Bahin Yojana
हे पण वाचा :- लाडकी बहीण योजना; घरात या 5 वस्तू असतील, तर महिलांना 6 वा हप्ता मिळणार नाही. नवीन नियम पहा
सध्याचे निकष काय
लाडकी बहिण योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आधार देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे.
- वयोगट : 18 ते 60 वर्षे.
- वार्षिक उत्पन्न : 2.5 लाखांपेक्षा कमी.
- इतर अटी : कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत किंवा आयकरदाता नसाववेत.
योजना जाहीर होण्याचा इतिहास
लाडकी बहिण योजना 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने जाहीर केली. 1 जुलैपासून महिलांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत.
योजनेच्या सुधारित निकषांमुळे काही महिलांमध्ये चिंता असली तरी या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य देण्याचे उद्दिष्ट कायम राहणार आहे.