महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना अंतर्गत, प्रोत्साहन पर अनुदान 50 हजार रुपये या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा ( Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojna Maharashtra)

Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojna Maharashtra: शेतकरी समाजाच्या कल्याणासाठी राज्य सरकारने विशेष योजना राबविल्या आहेत. ही योजना मागील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये पर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले होते.

शिवाय, ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जाची परतफेड केली होती, अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचीही तरतूद होती. गेल्या वर्षभरात या शेतकऱ्यांना दोन टप्प्यांमध्ये हे अनुदान त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहे. मात्र, अनेक शेतकरी अजूनही या लाभापासून वंचित राहिले आहेत. ( Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojna Maharashtra)

हे पण वाचा! 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

यावर पावले उचलत, सरकारने लवकरच अशा शेतकऱ्यांची यादी जाहीर करून त्यांच्या खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्याची घोषणा केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये पर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले होते. याच योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंतचा प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूद होती. ( Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojna Maharashtra)

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना हा लाभ मिळाला नाही. शिवाय, एकाच वर्षात दोनवेळा कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र, वर्तमान सरकारने नवीन नियम करून अशा शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार आता या संदर्भात माहिती गोळा करत आहे.

शेतकरी कर्जमुक्ती योजना या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळणार ( Farmer Will get 50 Thousand Money Maharashtra )

कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच 50,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. पंजाबराव देशमुख व्यवसाय सवलत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बहुतांश शेतकरी 31 मार्चपर्यंत कर्जाची परतफेड करणार आहेत. एकाच वर्षात दोनवेळा कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. ( Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojna Maharashtra)

पन्नास हजार रुपयांच्या या लाभासाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेल्या बँकेत जावे लागेल. तिथे दिलेल्या यादीत त्यांचे नाव शोधता येईल किंवा जवळच्या महा-ई-सेवा केंद्रामध्ये किंवा सीआयसी सेंटरमध्ये जाऊन ऑनलाइन यादी पाहता येईल. यादीत नावासमोर लाभासाठी केवायसी करावी लागणार आहे. केवायसी झाल्यानंतरच शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा लाभ मिळेल.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी हा महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना सामोरे जात असतानाच्या परिस्थितीत ही योजना त्यांना दिलासा देणारी ठरेल. शिवाय, शेतकऱ्यांची कर्जबाजारीपणापासून मुक्तता होऊन त्यांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल.( Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojna Maharashtra)

📣👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment