मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये! अर्ज करा | Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana: मित्रांनो, राज्यभरामधील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आता सरसकट ३ हजार रुपये मिळणार आहे, म्हणजे प्रत्येक वर्षाला राज्य शासन एवढी आर्थिक मदत करणार आहे.

शिंदे सरकारने एका नवीन अभिनव अशा योजनेला राज्यात मान्यता दिली आहे, योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना, या योजनेची अंमलबजावणी पण सुरू झाली आहे.

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra साठी कोण पात्र असणार? फायदे काय काय मिळणार? अर्ज कसा करायचा? अशी सविस्तर माहिती या पोस्टमध्ये मी दिली आहे. काळजीपूर्वक माहिती वाचा आणि त्यानुसार अर्ज सादर करा, म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला पण याचा लाभ घेता येईल.

Vanshavali: वंशावळ म्हणजे काय ? वंशावळ कशी काढायची ?


मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र
योजनेचे नाव Mukhyamantri Vayoshri Yojana
उद्देश महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणे.
लाभ ३ हजार रुपये आर्थिक मदत
लाभार्थी राज्यातील ज्येष्ठ नागरिक
वयाची अट अर्जदाराचे वय हे ६५ वर्षा पेक्षा जास्त असणे आवश्यक.
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ @alimco.in

Mukhyamantri Vayoshri Yojana Benifits (लाभ, फायदे)


Mukhyamantri Vayoshri Yojana
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फायदे हे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहेत, या योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदती बरोबरच इतर बरेच फायदे मिळणार आहेत.

मुख्यमंत्री वयोश्री योजना द्वारे सहभागी ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये DBT द्वारे थेट बँक खात्यात मिळणार आहेत.
योजनेद्वारे ३००० रुपये, वर्षाला मदत स्वरूपात शासन पैसे देणार आहे.
आर्थिक मदती बरोबरच वृध्द लोकांसाठी वेगवेगळे उपकरणे देखील दिले जाणार आहेत, जर ज्येष्ठ व्यक्ती अपंग असेल किंवा वयोमान अशक्त असेल, तर या उपकरणांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

Mukhyamantri Vayoshri Yojana Elegibility Criteria (पात्रता निकष)
महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शासनाने वेगवेगळे पात्रता निकष ठरवले आहेत, त्यानुसार जे व्यक्ती पात्र ठरतील त्यांनाच या योजनेत सहभागी होता येणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांचे वय हे कमीत कमी ६५ वर्षे असावे.
ज्येष्ठ नागरिकाचे वार्षिक उत्पन्न हे २ लाखा पेक्षा कमी असणे आवश्यक.
अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
जे अर्जदार वरील पात्रता निकषांची पूर्तता करतील, के त्यांनाच मुख्यमंत्री वयोश्री योजना मध्ये सहभागी होता येईल.

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra Document List (कागदपत्रे)
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

अर्जदाराचे आधार कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
ओळखपत्र
वयाचा पुरावा
रेशनकार्ड
अपंग असल्यास प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
पासपोर्ट फोटो
वर दिलेले सर्व कागदपत्रे हे तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करताना सादर करायचे आहे. कागदपत्रे Soft Copy आणि Hard Copy दोन्ही स्वरूपात असणे आवश्यक.

Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online
मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र ही योजना शिंदे सरकार मार्फत राज्यात सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय वयोश्री योजना प्रमाणे या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना लाभ वेगवेगळ्या प्रकारचे लाभ मिळणार आहे.

योजने संबंधी मंत्री मंडळात हा निर्णय घेण्यात आलेला आहे, परंतु अद्याप याची अर्ज प्रक्रिया सांगण्यात आली नाही. नवीन अपडेट येण्या आगोदर आम्ही तुम्हाला येथे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वयोश्री योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे? याची माहिती दिली आहे.

Maharashtra Mukhyamantri Vayoshri Yojana; साठी पण सारखीच अर्ज प्रक्रिया आहे, त्यामुळे तुम्ही पण या स्टेप वापरून योजनेसाठी सहजरित्या अर्ज सादर करू शकता.

सर्वप्रथम तुम्हाला वयोश्री योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायची आहे.
वेबसाईट वर गेल्यावर तुम्हाला Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online साठी रजिस्ट्रेशन फॉर्म वर क्लिक करावयाचे आहे.
काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे, सर्व माहिती अचूक टाकायची आहे. माहिती चुकीची आढळल्यास अर्ज हा बाद होऊ शकतो.
सूचनेनुसार आवश्यक ते सर्व कागदपत्रे Soft Copy मध्ये अपलोड करायचे आहेत, मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व त्यांची लिस्ट वर दिली आहे.
शेवटी वयोश्री योजनेचा फॉर्म भरल्यावर तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे.
अशा रीतीने तुम्ही Maharashtra Mukhyamantri Vayoshri Yojana साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करू शकतात.

मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यात राबवण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. निधीची पण तरतूद करण्यात आलेली आहे. काही दिवसात योजनेचा GR शासन निर्णय प्रसिद्ध होणार आहे, तेव्हा या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे? याची सविस्तर माहिती पोस्टमध्ये अपडेट करण्यात येईल.

अधिक माहिती वाचा

त्यामुळे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Group ला पण जॉईन करा.

Leave a comment

Close Visit Batmya360