Mukhymantri Ladki Bahin Yojana Online Apply: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा फॉर्म नारीशक्ती दुत या ॲप्लिकेशन वरून घरबसल्या मोबाईलवरून कसा भरायचा आहे, तुम्ही खालील पद्धतीने भरू शकतात. लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरू शकतात . तसेच अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची सविस्तर माहिती पाहूयात.
🔴 सर्व प्रथम प्ले स्टोअर वरून नारी शक्ती दुत हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावे.
🔴 मोबाईल नंबर, OTP आणि नियम आणि अटींवर क्लिक करून लॉग इन करा प्रोफाइल अपडेट पर्यायावर क्लिक करावे.
🔴 पूर्ण नाव, ईमेल आयडी, जिल्हा, तालुका आणि नारीशक्तीचा प्रकार ही सर्व माहिती भरावीत.
🔴 नारी शक्ती दुत या पर्यायावर क्लिक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या पर्यायावर क्लिक करावत.
🔴 ॲप्लिकेशन ला लोकेशनची परवानगी द्या. लाडकी बहिन योजनेचा फॉर्म उघडेल, फॉर्ममध्ये आधार कार्डची माहिती भरावी.
(संपूर्ण नाव, जन्मतारीख, पतीचे किंवा वडिलांचे नाव, तुमचे गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड, आधार कार्ड क्रमांक)
🔴 तसेच तुम्ही सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर त्याची माहिती भरा, इतर योजनेचा लाभ घेत नसल्यास ‘नाही’
या पर्यायावर क्लिक करावेत.
🔴 वैवाहिक स्थिती टाका स्त्रीच्या विवाहापूर्वीचा समावेश पूर्ण नाव टाकावा.
🔴 महिलेचा जन्म परराज्यात झालेला असेल तर ‘होय’ किंवा ‘नाही’ परराज्य ड्रॉपडाउन मधून होय निवडावा लागेल.
🔴 अर्जदाराचे बँक तपशील खाते क्रमांक, बँकेचे नाव, IFSC क्रमांक, आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहेत की नाही याचा तपशील भरावेत.
🔴 आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँकेचे पासबुक आणि महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास ते त्याचा दाखला हि सर्व कागदपत्रे अपलोड करावेत.
🔴 कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जदाराचा फोटो अपलोड करावा. मोबाईल कॅमेऱ्याने महिला अर्जदाराचा लाईव्ह फोटो काढावेत आणि अपलोड करणे आवश्यक आहेत.
🔴 या योजनेसाठी Accept हमीपत्र डिस्क्लेमर वर क्लिक करा अटी व शर्ती मान्य करावे. सबमिट फॉर्म बटणावर क्लिक केल्यानंतर तयार होणारा OTP प्रविष्ट करावा.
अशा पद्धतीने तुम्ही लाडकी बहिण योजनेचा फॉर्म घरबसल्या आपल्या मोबाईल वरुन भरू शकतात. अर्ज भरताना कुठेही चुक करू नका तसेच अर्ज भरताना मोबाईलला चांगले नेटवर्क असावेत. माहिती इतरांना नक्की शेअर करावी आणि नवनवीन माहिती साठी आपल्या व्हाटसॲप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. धन्यवाद! Mukhymantri Ladki Bahin Yojana Online Apply