New Rules From 1 January 2025 | आज 31 डिसेंबर आणि उद्यापासून 2025 या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. नवीन वर्ष सुरू झाले की, अनेक लोक नवीन संकल्प करत असतात. तसेच त्यांच्या सवयीमध्ये तसेच आयुष्यामध्ये अनेक बदल करत असतात. ज्याचा चांगला वाईट परिणाम त्यांच्या आयुष्यावर होत असतो. परंतु आता 1 जानेवारी 2025 पासून देशात अनेक नियम (New Rules From 1 January 2025) बदलणार आहेत. आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या बँक खात्यावर होणार आहेत. आता हे नक्की कोणते बदल होणार आहेत? हे आपण जाणून घेणारचं आहोत.
एलपीजी गॅस सिलेंडरचे दर | New Rules From 1 January 2025
दर महिन्याच्या 1 तारखेला सरकार एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल करत असतात. 19 किलोचा व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत अनेक बदल करण्यात आले आहेत
. 2025 मध्ये एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये वाढ होणार आहे, अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सध्या देशांतर्गत सिलेंडरची किंमत काही काळापासून स्थिर आहे. मुंबईमध्ये ही किंमत सध्या 803 रुपये एवढी आहेत.
पीएफ
पीएफ खातेधारकांना 2025 च्या सुरुवातीला काही नवीन गोष्टी मिळू शकते. त्यांच्यासाठी एक सोयीस्कर गोष्ट असणार आहेत. ती म्हणजे 2025 पासून त्यांचे पीएफचे पैसे त्यांना एटीएम मशीन मधून काढता येणार आहेत. यासाठी कामगार मंत्रालयाचे काम देखील सुरू आहेत. याबाबत कामगार सचिव सुमिता डावरा यांनी सांगितले की, श्रम आणि आरोग्य मंत्रालय करण्यासाठी आणि सेवा सुधारण्यासाठी आयोजित IT प्रणाली अपग्रेड करत आहे.
यूपीआय पेमेंट
RBI ने अलीकडेच फीचर फोन युजरसाठी एक बातमी दिलेली आहेत. ती म्हणजे आता UPI 123 पे वापरून 10 हजार रुपयांपर्यंतचे यूपीआय पेमेंट केले जाऊ शकते. ही नवीन सुविधा 1 जानेवारी 2025 पासून सुरु होणार आहेत. या आधी या पेमेंटची मर्यादा 5,000 रुपये एवढी होती. परंतु आता वाढवून ती 10 हजार रुपये पर्यंत करण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांना फायदा
रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी दिलेली आहे. त्यानुसार रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांना हमी शिवाय कर्जाची मर्यादा 2 लाख रुपये केली आहेत. हा नियम देखील 1 जानेवारी 2019 पासून लागू करण्यात येईल. यापूर्वी मर्यादा 1.6 लाख रुपये एवढी होती.
जीएसटीच्या नियमात बदल
करदात्यांना आता 1 जानेवारी 2025 पासून जीएसटीच्या कठोर नियमांना सामोरे जावे लागणार आहेत. यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय बदलण्यात आला आहे. तो म्हणजे आता अनिवार्य मल्टी फॅक्टर ऑथेंटीकेशन जीएसटी पोर्टलला भेट देणाऱ्या सर्व त्यांना ते लागू केले जाणार आहे. यामुळे सुरक्षा देखील वाढणार आहेत.