New Solar Pump List 2024 : सौरपंपांद्वारे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर सौरपंप मिळविण्यासाठी मोठी धडपड करत आहेत. याचा फायदा काही लोक घेत असून सोशल मीडियावर बनावट याद्या तयार करून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहेत. जर तुम्ही कुसुम सौर योजनेअंतर्गत तसेच मागेल त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइटवर तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकतात. तसेच तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील सौरपंपांसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन देखील तपासू शकतात.
सौरपंपासाठी पात्र शेतकऱ्यांची जिल्हानिहाय यादी पाहण्यासाठी (https://pmkusum.mnre.gov.in/#/beneficiary-list) या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. या पोर्टलवर, तुम्ही राज्य निवडताना महावितरण कडे अर्ज केला असेल MSDCL निवडायचा आहे आणि मेढा कडे अर्ज केला असेल तर MEDIA निवडायचा आहे. त्यानंतर जिल्हा निवडा आणि किती HP साठी अर्ज केला ते निवडा पुढे वर्ष निवडा तुमच्या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी ऑनलाइन पाहू शकतात. पात्र शेतकऱ्यांची जिल्हानिहाय यादी पाहण्यासाठी खाली दिलेली प्रोसेस स्टेप बाय स्टेप पूर्ण करावे.
सोलार पंप लाभार्थी यादी पाहण्यासाठी खालील PMkusum च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या..