Onion Rate Today: आज बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव (Onion Auction) बंद आहेत. मात्र काही निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची 35 हजार 594 क्विंटलची (ONion Rate) आवक झाली आहे. तर आज लाल आणि उन्हाळ कांद्याचा सरासरी 1500 रुपयांपासून ते 2900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. एकट्या रामटेक बाजार समिती उन्हाळ कांद्याला (Summer Onion) तब्बल 4100 रुपयांचा दर मिळालेला आहे.Onion Rate Today
आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार दौंड केडगाव बाजारात 2800 रुपये, सातारा बाजारात 2850 रुपये तर राहता बाजारात 2650 रुपयांचा दर मिळाला. त्यानंतर भुसावळ बाजार समितीत लाल कांद्याची 70 क्विंटलची आवक झाली या कांद्याला सरासरी 2800 रुपयांचा दर मिळाला. Onion Rate Today
पुणे बाजारात लोकल कांद्याची 8815 क्विंटलची आवक झाली. या कांद्याला 02 हजार रुपयांचा दर मिळाला. आज पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याची 5466 क्विंटल आवक झाली. या कांद्याला सरासरी 2600 रुपयांचा दर मिळाला. तर रामटेक बाजार समितीतून कांद्याची केवळ 60 क्विंटलची आवक झाली. मात्र कमीत कमी दर 04 हजार रुपये तर सरासरी दर 04 हजार 100 रुपयांपर्यंत मिळालेला आहे. Onion Rate Today