Ration Card Big News: रेशन धान्य वाटपात रेशन दुकानदार अनेक ठिकाणी कमी धान्य देत असतात. तसेच जास्त पैसे घेत आहेत आणि काही ठिकाणी राशन देत नाही असे प्रकार सुरू आहे. या सर्व गैरवापर (काळाबाजार) थांबवण्यासाठी आणि धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला हक्काचे राशन मिळण्यासाठी पुरवठा विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला असल्याचे पाहायला मिळत आहे. आता रेशन धारकांना रेशनची माहिती मोबाईल वर मेसेज द्वारे मिळणार असल्याची माहिती दिली पुरवठा विभागानी दिली आहे.
(अन्न आणि नागरी पुरवठा तसेच – ग्राहक संरक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य छगन भुजबळ)
Ration Card Big News
पुरवठा विभागाने राशन कार्ड आणि मोबाईल क्रमांक लिंक करण्याची मोहीम सुरू केलेली असल्याचे देखील पहायला मिळत आहे. या मोहिमेत कुटुंबातील एका सदस्यांचा मोबाईल क्रमांक राशन कार्ड ला जोडण्यात येणार आहे आहे. या मोबाईल नंबर वरती कुटुंबातील सदस्याच्या संख्येनुसार धान्य खरेदीची माहिती मिळणार आहेत. तसेच तुम्हाला धान्य किती आलेले आहे आणि किती मिळालेले आहे हे तपासता येणार आहे. रेशन वाटप कधी होणार याची माहिती काही दिवस आधी मेसेज द्वारे कळवली जाणार आहेत.
लाडका भाऊ योजना: या तरुणांना दरमहा १० हजार मिळणार; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! Mukhymantri Ladka Bhau Yojana
अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य छगन भुजबळ यांनी राशन कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याचे अवाहन केलेले आहेत. आतापर्यंत 01 कोटी 24 लाख शिधापत्रिकेला मोबाईल नंबर लिंक करण्याचे काम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितलेले आहेत. राशन धान्य वाटपात पारदर्शकता आणि राशन बद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी लवकर आपले राशन कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचे आहे.(अन्न आणि नागरी पुरवठा तसेच – ग्राहक संरक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य छगन भुजबळ)