Solar Pump Yojana Online Apply : आता शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सोलर पंप योजनेसाठी सध्या ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. आणि आता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर, अर्ज कसा करायच? अर्ज कुठे करायचा? कोणती कागदपत्रे लागतील? अशी सर्व माहिती आपण खाली पोस्टमध्ये पाहत आहोत.
Solar Pump Yojna Online Apply
खूप दिवसापासून शेतकरी मोठ्या आतुरतेने सौर कृषी पंप योजनेचे अर्ज कधी सुरू होणार आहेत याची वाट पाहत होते. आता शेवटी प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. आणि तुम्ही जर तुम्हाला जर कृषी पंपासाठी अर्ज करायचा असेल, तर तुमच्या जिल्ह्यातील उपलब्ध असणाऱ्या सर्व कृषी पंपाच्या कोट्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता. ( Solar Pump Yojna Online Apply )

हे पण महत्त्वाचं आहे 👉👉 Solar Pump Yojna; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! मुख्यमंत्री सौर पंप योजनेतून मिळणार मोफत सोलर पंप
प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. या योजनेच्या अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गामधील शेतकऱ्यांना 90% अनुदान दिले जाणार आहे. तसेच उर्वरित 10 टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागेल. तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95% पर्यंत अनुदान हे सर्कल कडून मिळणार असून उर्वरित 5 टक्के रक्कम हिस्सा हा शेतकऱ्यांना भरावा लागणार असल्याची माहिती नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. ( Solar Pump Yojna Online Apply )
महाराष्ट्र सरकारच्या मार्फत सौर पंप मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 “Mukhymantri Solar Pump Yojna” आणि पीएम कुसुम सोलर पंप योजना “PM Kusum Solar Pump Yojna” च्या दोन महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जात आहेत आणि या दोन्हीही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या समान च आहे परंतु या अनुदानातील अटी आणि शर्ती मध्ये वेगवेगळे बदल आहेत.
कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज | Kusum Solar Pump Yojana Online Apply
सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज कुठे करावा?
- तुम्हाला अर्ज करण्यासाठी खालील पोर्टल वर नोंदणी करावी लागणार आहे.
- मोबाईल मध्ये पुढील https://www.mahaurja.com/ ही साईट ओपन करावी लागेल.
- नंतर तुम्हाला महाऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप योजना अर्ज नोंदणी हा पर्याय उपलब्ध होईल त्यावर क्लिक करून तुम्ही या योजनेसाठी सहजरित्या अर्ज करू शकता.

- आज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास खाली YouTube Video दिलेला आहे तो पाहून तुम्ही आपला अर्ज भरू शकता. Solar Pump Yojna Online Apply
- शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करताना अर्ज अचूक पद्धतीने भरणे गरजेचे आहे. कारण की एकदा अर्ज भरल्यानंतर त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येत नाही. हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
- तुम्ही हा ऑनलाईन अर्ज तुमच्याजवळ आपले सरकार सेवा केंद्र किंवा कोणत्याही ऑनलाईन प्रणाली द्वारे सादर करू शकता.