वाल्मीक कराड बद्दल कोर्टात 7 खळबळजनक दावे, एसआयटीच्या दाव्यांनी कोर्ट सुद्धा हादरलं पहा

Walmik karad Beed Court: बीड – पवनचक्की कंपनीला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी संशयित आरोपी वाल्मीक कराड याच्या अडचणीत खुपचं वाढ झालेली आहे. कालच कराडविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, आणि आज एसआयटीने कराडला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपासासाठी ताब्यात घेतलेले आहेत. आज झालेल्या सुनावणी दरम्यान एसआयटीने वाल्मीक कराड संदर्भात सात मोठे दावे केलेले आहे.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

एसआयटीचे वाल्मीक कराड बाबत 7 खळबळजनक दावे पुढीलप्रमाणे:

  1. खंडणी प्रकरण आणि हत्येचा संबंध: खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात थेट संबंध असल्याचा दावा एसआयटीने केलेला आहेत. पवनचक्की कंपनी ‘अवादा’ कडून खंडणी मागण्यात सरपंच देशमुख अडथळा ठरलेले होते, म्हणून त्यांची हत्या करण्यात आल्याचे एसआयटीने न्यायालयाला सांगितलेले आहेत.
  2. खंडणीसाठी वारंवार धमक्या: अवादा कंपनीकडे अनेक वेळा खंडणी मागण्यात आलेली होती. मात्र, कंपनीने पैसे दिले नाहीत. याच दरम्यान संतोष देशमुख यांच्यासोबत वाद झालेला होता.
  3. हत्येपूर्वी आणि नंतर आरोपी संपर्कात: सरपंच देशमुख यांचे अपहरण आणि हत्या करण्यापूर्वी आणि नंतर विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड एकमेकांच्या संपर्कात आले होते, हे सीडीआर अहवालातून स्पष्ट होत असल्याचे एसआयटीने न्यायालयाला सांगितलेले आहे.
  4. कंपनीचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न: २९ नोव्हेंबर पूर्वी सुदर्शन घुले याने अवादा कंपनीचे काम बंद पाडलेले होते. तसेच, कंपनीचे शिवाजी थोपटे यांना अनेकवेळा परळी येथील कार्यालयात बोलावून वाल्मीक कराड याने दोन कोटींची खंडणी मागितलेली होती.
  1. धमकीसाठी इतरांच्या फोनचा वापर: २९ नोव्हेंबर रोजी कराड याने विष्णू चाटे याच्या फोनवरून सुनील शिंदे यांना फोन करून काम बंद करण्याची धमकी दिलेली होती. त्याच दिवशी सुदर्शन घुले याने कंपनीत जाऊन धमकी दिलेली होती.
  2. कर्मचाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ: ६ डिसेंबर रोजी घुले आपल्या साथीदारांसह कंपनीत गेला आणि त्याने तेथील सुरक्षा रक्षक आणि शिवाजी थोपटे यांना मारहाण करून शिवीगाळ केलेली होती.
  3. हत्येच्या दिवशी आरोपी संपर्कात: सुरक्षा रक्षक हा मस्साजोग गावचा रहिवासी आहे. त्या दिवशी सरपंच संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी याला विरोध केलेला होता. ९ डिसेंबर रोजी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी खंडणीला अडथळा ठरणाऱ्या संतोष देशमुख यांचा खून केलेला आहे. या सर्व घटना घडत असताना वाल्मीक कराड आरोपींच्या संपर्कात होता, हे सीडीआर अहवालातून दिसून येत असल्याचा दावा देखील एसआयटीने केलेला आहे.

कराडच्या अडचणीत वाढ:
एसआयटीच्या या दाव्यांमुळे वाल्मीक कराड याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहेत. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पुढील सुनावणीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️