Walmik Karad | बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरलेला आहे. कारण या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप हे सध्या सुरु आहेत. दरम्यान, बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड अखेर सीआयडीला शरण आलेल आहेत. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करलेली आहेत.
सीआयडी चौकशी करणार-
वाल्मिकी कराडची (Walmik Karad) सीआयडी कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर करणार आहेत. शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकीने एक व्हिडीओ शेअर करून मोठा दावा केलेला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 22 दिवस उलटले आहे. या प्रकरणातही वाल्मिकी कराडचं नाव घेतलं जात आहेत. त्याअनुषंगानेही चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहेत.
मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडीसमोर हजर होत आहेत. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावीत, आणि फाशी द्यावी. राजकीय कारणासाठी माझं नाव घेऊ नयेत. या प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला शिक्षा द्यावी, असं वाल्मिक कराडने म्हटलेले आहे.
चार आरोपींना अटक-
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे अशी या आरोपींची नावे आहे. तर, मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे फरार आहे.
या वेळी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखने याबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहेत, ‘वाल्मिक कराड (Walmik Karad) स्वतः पोलिसांना शरण गेले तर मग इतक्या दिवस पोलीस काय करत होते?’, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला जात आहे. सध्या वाल्मिक कराड यांच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल असून त्यांच्या अटकेनंतर आता पुढील तपास लवकरच केला जाणार आहे.