Walmik Karad Wife l आज वाल्मिक कराडवर मोक्का लावून 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याचे कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले आहे. अशातच सकाळपासून वाल्मिक कराडची आई आणि पत्नी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहेत. मात्र यावेळी या संपूर्ण प्रकरणावर वाल्मिक कराडची बायको प्रचंड संतापलेली आहेत.
वाल्मिक कराडची बायको काय म्हणाली आहे? :
वाल्मिक कराडवर मोक्का लावल्यानंतर त्याच्या बायकोने प्रचंड आक्रमक प्रतिक्रिया दिलेली आहे. “या प्रकरणात निव्वळ जातीयवाद होत असल्याचं तीन म्हंटल आहेत. तसेच कोणतेही पुरावे नसताना त्यांच्यावर म्हणजेच वाल्मिक कराडवर केवळ दबावातून कारवाई केलेली जात आहे. मात्र हे सर्व प्रकरण अतिशय अयोग्य असल्याचं वाल्मिक कराडच्या पत्नीने म्हटलं आहेत”.
याशिवाय “त्यांचा म्हणजेच वाल्मिक कराडचा खंडणी आणि खून प्रकरणात कुठलाही सहभाग नाहीत. परंतु, हे आंदोलन आणि वेठीस धरून वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होणार असान तर हा प्रकार अजिबात चांगला नाहीत. कारण आता त्यांच्यावर जाणून बुजून कारवाई करायला लावणार असतीन तरे हे लवकरात लवकर थांबल पाहिजे”, असं वाल्मिक कराडची पत्नी म्हणालेली आहे.
Walmik Karad Wife l “या प्रकरणात जातीयवाद केला जातोय” :
याप्रकरणी कराडच्या बायकोला पोलीस आणि सरकार अशी कारवाई कशामुळे करतंय? असा प्रश्न विचारताच त्यांनी उत्तर दिलेले आहेत. यावेळी त्या म्हणाल्या की, “या प्रकरणात जातीयवाद केला जात आहेत. कारण जातीवादाशिवाय दुसरा काहीही विषय यामध्ये येत नाहीत. तसेच गुन्हेगाराला जात नसते. त्यामुळे पोलिसांना तपास करायचा असल्यास करावा, मात्र जात मध्ये आणून तुम्ही नेमकं काय साध्य करताय? तसेच ते दोषी नाहीयेत”, अशी बाजू वाल्मिक कराडच्या पत्नीने मांडलेली आहे.
दरम्यान, वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आल्याची बातमी कळताच परळीत कराड समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहे. यामध्ये वाल्मिक कराडची पत्नी, आई आणि नातेवाईकांनी देखील आंदोलनाचा पवित्रा घेतला आहेत.