Insurance Scheme: नमस्कार मित्रांनो, आता असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम चे नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर या पोर्टलवर अर्ज करणाऱ्या कामगारांना आता एक रुपयाही खर्च न करता दोन लाख रुपयांचे विमा कवच सरकारकडून दिले जाणार आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
या योजनेची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈
मित्रांनो सामायिक सेवा केंद्र व राज्यसेवा केंद्रावर तुम्ही तुमची नोंदणी सहजरित्या तुम्ही करू शकता. त्याचबरोबर या नोंदणीचा लाभ तुम्हाला भविष्यात नक्कीच मिळणारच आहे. परंतु तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम नोंदणी करावी लागणार आहे. त्याचबरोबर या योजनेची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला CSC सेंटरला जावे लागणार आहे.
नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:-आधार कार्ड, बँक पासबुक, राष्ट्रीयकृत बँक व बँकेचा आयएफएससी कोड, तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर त्याच बरोबर तुमचा हा नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.