आज आणखी 16 लाख लाडक्या बहिणींना सरकारचं गिफ्ट; खात्यावर आले 3000 रुपये, लगेच करा चेक!

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) पात्र महिलांच्या बँक खात्याता पैसे जमा केले जात आहे. आतापर्यंत 80 लाख महिलांच्या बँक खात्यावर राज्य सरकारने 3000 रुपये पाठवलेले आहे. असे असतानाच सरकारने आणखी 16 लाख लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणारा सन्मान निधी दिलेला आहे. तशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिलेली आहे.

आदिती तटकरे काय म्हणाल्या आहे?


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. आज सकाळपासून 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झालेला आहे. त्यापूर्वी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झालेले होते. सद्यस्थितीत एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तसेच उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले आहेत.

लाडक्या बहिणींनो, अजून 3 हजार रुपये मिळाले नसतील तर; ‘हे’ एक काम करा, पैसे लगेच जमा होतील Ladki Bahin Yojana Money Status

15 ऑगस्ट रोजी 48 लाख महिलांना लाभ
याआधी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस 14 ऑगस्ट रोजी 32 लाख महिलांना तर 15 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजता 48 लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आलेला. ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला व बालविकास विभाग 24 तास कार्यरत असून या सर्व प्रक्रियेवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितलेले होते. 31 जुलैपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या बँक खात्यावर सध्या 3000 रुपये जमा केले जाणार आहे. नंतर हळूहळू सर्व महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवले जाणार आहेत

योजनेची अंतिम तारीख काय?

दरम्यान, या योजनेसाठी फक्त 31 ऑगस्टपर्यंतच अर्ज करता येतील, असे सांगितले जात होतेच. पण आदिती तटकरे यांनी याआधीच स्पष्ट केल्याप्रमाणे या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम कोणतीही तारीख नाही. अर्ज करण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील. त्यामुळे 31 ऑगस्टनंतरही महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे.

Leave a comment

Close Visit Batmya360