10वी चा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर होणार; वेबसाईट येथे पहा! SSC Result 2024

राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांकडून दहावीची लेखी परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ या कालावधीत घेण्यात आली. ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ सूत्रानुसार निकाल जाहीर केला जाणार आहे. अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

SSC Result 2024

प्रथमच मेमध्ये दहावीचा निकाल जाहीर होत आहे. यापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याची मंडळाची परंपरा होती. अंतर्गत प्रात्यक्षिक व मूल्यमापनाचे गुण ओएमआर शीटऐवजी ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर भरल्याने निकाल एक ते दीड आठवडा अगोदर जाहीर करणे शक्य झाले आहे.

या संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल

https://sscresult.mkcl.org

https://results.digilocker.gov.i

https://mahresult.nic.in

https://sscresult.mahahsscboard.in

विद्यार्थ्यांना वरील संकेतस्थळावरून निकाल पाहता येईल तसेच विषयनिहाय मिळालेल्या गुणांची प्रत (प्रिंट) काढून घेता येणार आहे.

सर्व महिलांना प्रत्येक महिन्याला मिळणार 1000/- रुपये; येथे पहा सविस्तर माहिती!

गुणपडताळणीसाठी 28 मे पासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी 28 मे ते 11 जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल.SSC Result 2024

उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट 2024 व मार्च 205 मध्ये गुण सुधार अंतर्गत परीक्षा देता येईल. SSC Result 2024

सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

Close Visit Batmya360