लाडकी बहीण हा नवीन हेल्पलाइन नंबर सुरु! Ladki Bahin Helpline Number

लाडकी बहीण योजना, हेल्पलाइन झाली सुरू – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ तालुक्यातील सर्व पात्र महिलांना मिळावेत यासाठी त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ladakibahin.maharashtra.gov.in पोर्टलच्या १८१ या टोल फ्री नंबर वर आपण सपंर्क करू शकतात. तसेच पंढरपूर तहसील कार्यालय येथे ०२१८६-२२३५५६ हा हेल्पलाईन क्रमांक (Ladki Bahin Helpline Number) सुरू करण्यात आलेला आहे. या योजनेंतर्गत ज्या लाभार्थीना कुठल्याही अडचणी किंवा समस्या आल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावेत. असे आवाहन पंढरपूर तहसील प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. या संदर्भातील सर्व अपडेट्स साठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करावे.

तसेच महाराष्ट्रातील अन्य बहिणींसाठी NCP द्वारे 09861717171 हा हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आलेला आहेत.

3000 रूपये जमा झाले नाहीत, आता काय करायचे? पहा सविस्तर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, त्याद्वारे पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात, तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाहीत याकरिता तालुका प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने अहोरात्र काम करीत तहसील प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.

स्वावलंबीकरण, करण्याबरोबरच आत्मनिर्भर महिलांच्या सशक्तीकरणाला चालना देण्याकरिता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. योजनेंतर्गत समाजातील सर्व घटकातील पात्र महिलांना प्रतिमाह 1500 रुपयांचा लाभ देण्यात येणार असून त्याकरिता महिलांनी तत्काळ अर्ज करावेत, असे आवाहन तहसीलदार सचिन लंगटे यांनी केलेले आहेत.

Leave a comment

Close Visit Batmya360