रेशन कार्डची ई-केवायसी कशी करायची? जाणून घ्या | Ration Card EKyc Maharashtra

Ration Card E Kyc: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारतर्फे आता रेशन कार्डची ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जर तुम्ही तुमची रेशनकार्ड इ केवायसी केली नाही तर सरकार तुमचं रेशन बंद करणार आहेत.

कुटुंबात जेवढे काही सदस्य आहेत त्या सर्वांची Ration Card eKyc करावी लागणार आहेत, ज्या सदस्याची Kyc करणे राहून गेले त्यांचे नाव सरकार द्वारे डायरेक्ट कमी केले जाणार आहेत.

एकदा का नाव कमी झाले, की मग नंतर तुमच्या नावचे रेशन बंद होणार आहेत. त्यामुळे निष्काळजीपणा करू नका, या पोस्टमध्ये मध्ये सांगितल्या प्रमाणे तुमची Ration Card eKyc करून घ्यायचे आहे.

Ration Card eKyc

सरकारने रेशन कार्ड मधून मयत व्यक्तीचे नाव  काढुनी टाकण्यासाठी Ration Card eKyc करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.

सर्व शिधापत्रिका धारकांना त्यांच्या रेशन कार्डची ई-केवायसी करून  घ्यायची आहे. जे लोक kyc करणार नाही. त्यांना रेशन मिळणार नाही.

केंद्र सरकार गरीब कल्याण योजना राबवत आहेत, त्या अंतर्गत मोफत धान्य दिलं जाते आहे. मोफत धान्य मयत व्यक्तीच्या नावे जाऊ नयेत, यासाठी आता kyc ची अट लावण्यात आलेली आहे.

लाडकी बहीण योजना तुर्तास झाली बंद ! महिला आणि बालकल्याण विभागाचा मोठा निर्णय

Ration Card eKyc Maharashtra

महाराष्ट्र अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने या संदर्भात जाहीर आवाहन करण्यात आलेले आहेत.

Ration Card eKyc Maharashtra

शिधापत्रिका धारकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, आपल्या शिधापत्रिका मधील जे सदस्य मयत आहे. परंतु, त्याचे नाव शिधापत्रिकेमधुन वगळण्यात आलेल नाही अशा सदस्याचे नाव तात्काळ कमी करून घेण्यासाठी शिधावाटप कार्यालयात संपर्क करावेत.

ज्या शिधापत्रिकेवर शिधाजिन्नस प्राप्त होत आहेत, अशा सर्व शिधापत्रिका धारकांना नम्र आवाहन करण्यात येत आहे..

कृपया आपण आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या शिधापत्रिकेमधील जेवढ्या व्यक्ती आहे. त्या सर्वांचे आधार कार्ड घेऊन त्यांचे सत्यापन (व्हेरीफीकेशन) करुन घेणे सक्तीचे करण्यात  आले आहे. अन्यथा ज्या व्यक्तींचे सत्यापन (व्हेरीफीकेशन) होणार नाहीत, त्यांचे शिधापत्रिकेमधून नाव वगळल्यास किंवा त्यांचे शिधा वस्तू बंद झाल्यास, सर्वस्वी जबाबदारी शिधापत्रिका धारकाची राहीन. कृपया याची नोंद घ्यावीत.

Ration Card eKyc Status Check

रेशन कार्ड ची E-Kyc झालेली आहे की नाहीत, हे जर तुम्हाला तपासायचे असेल तर खाली दिलेली माहिती वाचावी, आणि स्टेप बाय स्टेप गाईड फॉलो करून तुमचे Ration Card eKyc Status पाहून घ्यावे.

  • मोबाईल वर प्ले स्टोर मध्ये जाऊन मेरा राशन ( Mera Ration )हे ॲप डाऊनलोड करायचे आहे.
  • त्यानंतर ॲप Open करावे, तुमचा रेशन कार्ड RC Number किंवा आधार नंबर टाकावा.
  • त्यानंतर खालच्या सबमिट बटणावर क्लिक करा.
  • पुढे आधार सिडींग हा ऑप्शन शोधावे.
  • तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सिडिंग Yes किंवा No असं दिसते.
  • ज्यांच्या नावापुढे Yes आहे त्यांना Ration Card ची eKyc करण्याची गरज नाहीत.
  • फक्त ज्यांच्या नावापुढे No आले आहे त्यांना मात्र e kyc करावी लागते आहे.

Ration Card eKyc कशी करावी?

रेशन कार्ड eKyc करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.

टीप: रेशन कार्ड ची kyc सर्व सदस्यांना करावी लागते, केवळ कुटुंब प्रमुखाला kyc करायची नसते.

सुरुवातीला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड घ्यायचे आहे.

त्यानंतर सर्व सदस्यांना घेऊन तुमच्या गावातील किंवा जवळील रेशन दुकानात जायचे.

तिथे रेशन दुकान चालकाला Ration Card eKyc करण्याची विनंती करायची आहे.

सर्व सदस्यांचे आधार कार्ड दुकानदाराकडे द्यावे.

एक एक करून रेशन दुकान चालक तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे अंगठे ई-पॉस मशीन वर घेतो.

Verification पूर्ण झाल्यावर कुटुंबातील सर्व जणांचे Ration Card eKyc पूर्ण होईन.

Ration Card eKyc Last Date Maharashtra

रेशन कार्ड ची ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑक्टोबर 2024 आहेत. या तारखेच्या आगोदर तुमची ration card kyc करून घ्या, अन्यथा तुमचे रेशन बंद होणार आहेत.

रेशन कार्ड ekyc करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहेत, आगोदर 30 सप्टेंबर शेवटची तारीख होती, आता 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

त्यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुमची रेशन कार्ड kyc करून घ्यावी.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360