आनंदाचा शिधा; 100 रूपयात 4 वस्तू मिळणार, पहा कधी? Ration Card News

Ration Card News: गोरगरिबांना सण आनंदाने साजरे करता यावे यासाठी सुरू करण्यात आलेली ‘आनंदाचा शिधा’ ही योजना गौरी गणपती उत्सवासाठी देखील राज्य सरकार राबविणार आहेत. राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ रेशनकार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ चे वाटप करण्यात येणार आहेत. १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत हे वाटप करण्यात येणार आहे.

4 वस्तू कोणत्या आहेत? Ration Card News

मागील दोन वर्षांपासून गौरी गणपती, दिवाळी, गुढी पाडव्याच्या निमित्ताने आनंदाच्या शिध्याचे वाटप केले जात आहे. राज्यातील नागरिकांकडून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने ही योजना यंदाही राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत. १०० रुपये या सवलतीच्या दराने हा शिधा वाटप केला जातो आहे. ‘आनंदाचा शिध्यामध्ये एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर तेल अशा 4 वस्तू दिल्या जात आहेत.

50 हजार प्रोत्साहन अनुदानाची यादी आली! लवकर ई केवायसी करा

कोणते लाभार्थी पात्र ?

आनंदाचा शिधा छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा आणि १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषे(एपीएल) पिवळे/केशरी शिधापत्रिका धारकांना 15 सप्टेंबरपर्यंत वाटप करण्यात येणार आहेत.

Leave a comment

Close Visit Batmya360