IMD Alert : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात व अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात कोकणासह मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. अशा प्रकारचा हवामान अंदाज पंजाबराव डंख आणि हवामान विभागाने सांगितलेला आहे.
यामुळे आता परत एकदा शेतकऱ्यांना अवकळी पावसाचा फटका बसू शकतो. गेल्या दोन दिवसापासून देशात सर्व ठिकाणी हवामानात बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
काही ठिकाणी थंडी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असून काही राज्यात धोक्याचे प्रमाणही वाढलेले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीने नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे.
महाराष्ट्रात “या ठिकाणी” पावसाची शक्यता आहे
हवामान नवीन अंदाजानुसार 20 जानेवारी पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे. तर ते दोन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र मध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने व पंजाब डख यांनी देखील नवीन अंदाजानुसार अशा प्रकारची माहिती दिलेली आहे.
याबरोबरच पुण्यामध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील नागपूर सह अन्य जिल्ह्यात पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. IMD Alert
हे पण वाचा..! 👉 1 जानेवारी पासून नवीन वर्षात मोफत रेशन बंद; सरकारचा नवीन नियम
“या राज्यामध्ये” अवकाळी पावसाचा अंदाज
IMD माहितीनुसार, पश्चिम विषुववृत्तीय हिंदी महासागर तसेच लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावरील पूर्वेकडील लाट आणि कमी दाबाच्या निर्माण झालेल्या या विशिष्ट क्षेत्रामुळे 5 जानेवारी पर्यंत दक्षिण तमिळनाडू तसेच दक्षिण केरळ आणि लक्षद्वीप बेटावर पावसाचे प्रमाण पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
याबरोबरच उत्तरेकडील राज्य यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आणि छत्तीसगडमध्ये देखील बुधवार ते शनिवार दरम्यान हलका पाऊस पडू शकतो. अशा प्रकारचा अंदाज देखील भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. IMD Alert
लेक लाडकी योजना 2023 | मुलींना मिळणार 75 हजार रुपये ; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा..!
दिल्लीमध्ये देखील नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लोकांना प्रचंड थंडीचा अनुभव आलेला पाहायला मिळाले आहे. कमाल तपमान १७° सेल्सिअस देखील नोंदवले गेले,व. याशिवाय इतर अनेक राज्यांमध्ये देखील थंडीची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने अशा प्रकारची माहिती दिलेली आहे आणि त्यानुसार 15 ते 20 जानेवारी दरम्यान तापमानात घट होण्याची अपेक्षा देखील असून हवामानातील या बदलामुळे काही तर भारतीय राज्य मध्ये थंडीची लाट देखील निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. IMD Alert