PM Kisan Yojana 2024: नमस्कार शेतकरी बांधवांनो..!! नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, पी एम किसान योजनेच्या रकमेत तब्बल 3000 रुपयांनी वाढ होणार आहे. या वाढीसह शेतकऱ्यांना आता वार्षिक 9000 रुपये आर्थिक मदत मोदी सरकारकडून दिली जाणार आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहूयात…
केंद्रातील मोदी सरकारने 2019 मध्ये पंतप्रधान किसान योजना सुरू केली. आणि ही योजना देखील एक लोकप्रिय योजना बनली आहे. आता आपल्या सर्वांना माहितच आहे. की या योजनेत वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. पण नेमका आता काय निर्णय झाला ते आपण येथे बघू.PM Kisan Yojana 2024
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन वर्षात पीएम किसान योजनेतील पैसे वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. ते फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात सादर केले जाईल. विशेष म्हणजे 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकाही होत आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहे.
पीएम किसान योजना अपडेट
या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार पीएम किसान योजनेची रक्कम वाढवणार असल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये कृषी क्षेत्राला 2 लाख कोटी रुपयांचे बजेट मिळण्याची शक्यता आहे. गेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी 1.54 लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.
दरम्यान, आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात ही रक्कम 39 टक्क्यांनी वाढून 2 लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशाच्या कृषी क्षेत्राला निश्चितच मोठा आधार मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, पीएम किसान योजनेला मार्च 2024 मध्ये पाच वर्षे पूर्ण होतील.PM Kisan Yojana 2024