RBI Bank News: नमस्कार मित्रांनो, RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँक देशभरात सर्वात मोठी आणि सरकारची बँक म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर ही बँक सर्वात मोठी असल्याने अनेक महत्वाचे आणि दुसऱ्या बँके संदर्भात RBI ही बँक निर्णय घेते. त्यातच RBI ने आणखीन काही बँकांचे परवाने रद्द केलेले आहेत. यामुळे त्या बँकेच्या खातेदारांना मोठ्या त्रासाला सामोरे जाव लागत आहे. RBI Bank News
भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबईतील कपोली को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा (द कपोली को-ऑपरेटिव्ह बँक) परवाना रद्द केलेला आहे. बँकेने या निर्णयामागील कारणे म्हणून अपुरे भांडवल आणि कमाईची क्षमता ही नमूद केली आहे.
हे पण महत्त्वाचं आहे 👉 Kunbi Caste Certificate: कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया; ( संपूर्ण माहिती)
या बँकेतून पैसे काढता येत नाहीत
RBI रिझव्र्ह बँकेने (बँक) एका प्रसिद्धीपत्रकात जाहीर केलेले आहे. की, परवाना रद्द केल्यामुळे ठेवी स्वीकारणे, आणि काढणे यासारख्या बँकिंग क्रियाकलापांवर तात्काळ प्रभावाने निर्बंध हे घालण्यात आले आहेत.
आरबीआयने कोणत्या बँकेचे परवाने रद्द केले आहेत. हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
बँक बंद करण्याचे आदेश (RBI Bank News)
सहकार मंत्रालयानं अतिरिक्त सचिव आणि सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक यांना बँक बंद करण्याचा आदेश जारी करून लिक्विडेटर नियुक्त करण्याची विनंती केलेली आहे.
ग्राहकांना 5 लाख रुपये मिळतील
RBI ने जाहीर केले की प्रत्येक खातेदाराला विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून 5 लाख रुपयांपर्यंतचा ठेव विमा दावा मिळण्याचा अधिकार असणार आहे. बँकेचे सुमारे 96.10 टक्के ठेवीदार त्यांच्या संपूर्ण ठेवी DICGC कडून प्राप्त करण्यासाठी पात्र असतील.