Budget 2024: केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमण यांनी काल दिनांक 01 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणत्या वस्तु स्वस्त तर कोणत्या स्वस्त महाग झालेल्या आहेत , याबाबत सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहुयात .
वित्त मंत्रालयांकडून भविष्यातील उज्ज्वल बाबींवर अधिक विचार केलेला आहे . तर काही गोष्टींवर अधिक कर लादण्यात आलेला आहे . यामुळे सदर बाबी ह्या अधिकच महाग होणार आहेत . तर काही वस्तुंवरचे कर हे कमी करण्यात आल्याने सदरच्या वस्तु ह्या अधिकच स्वस्त होणार आहेत . कोणत्या वस्तु महाग होतील , कोणत्या वस्तु स्वस्त होतील , याकडे सर्वांचेच लक्ष वेधले होते .
कोणत्या वस्तु झाल्या स्वस्त ? : या नवीन सदरच्या अर्थसंकल्पानुसार टीव्ही , टीव्हीचे सुटे भाग , इलेक्ट्रिक वाहने , इलेक्ट्रिक कारची बॅटरी , हिऱ्याचे दागिने , खेळणी , कॅमेरा लेन्स , कपडे , बायोगॅसशी संबंधित वस्तू , लिथिमस सेल्स , सायकल तसेच सर्वांसाठी फायदेशिर मोबाईल फोन आदी गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत .
या वस्तु झाल्या महाग : सदर अर्थसंकल्पातील घोषणानुसार विदेशी किचन चिमणी , मद्य , सिगारेट , एक्स – रे मशीन , छत्री , सोने , आयात करण्यात आलेले चांदीचे दागिने , चांदीचे भांडे , हिरा तसेच प्लॅटिनम त्याचबरोबर कम्पाउंडेड रबर इत्यदी गोष्टी महाग झालेल्या आहेत .
भारतांमध्ये उत्पादन करण्यात येणाऱ्या मोबाईल फोन साठी आवश्यक सुटे भागावरील आयात शुल्क हे आता 15 टक्क्यांवरुन 10 टक्के करण्यात आल्याने मोबाईल फोनच्या किंमतीमध्ये 05 टक्यांची सुट मिळणार आहे. यांमध्ये स्मार्ट फोनच्या सुटे भागांचा देखिल समावेश आहे , भारतांमध्ये देखिल स्मार्ट फोनच्या किंमती काही अंशी स्वस्त होतील .