आताची मोठी बातमी! राज्यातील शाळांची वेळ बदलली; आता “या” नवीन वेळेत भरणार शाळा ( School Timing Change )

School Timing Change : राज्यातल्या सर्व पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. लहान मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी सकाळच्या शाळांच्या वेळा बदलवण्याच्या सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी काही दिवसांपूर्वी केलीली होती. राज्यपालांच्या सूचनेला राज्यातील पालक, शिक्षक आणि अभ्यासकांकडून पाठिंबा दर्शवण्यात आला होता. राज्यात बहुतांश शाळा सकाळी ७ वाजताच्या आसपास भरतात. ही वेळ ९ पर्यंत पुढे नेल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन शिकण्यात ही लक्ष लागेल. तसंच पालकांची सकाळी ५ वाजल्यापासून होणारी धावपळ कमी होईल, अशी भूमिका पालकांकडून मांडण्यात येत होती. याला राज्याच्या शिक्षक विभागाने  देखील प्रतिसाद दिला आहे.  ( School Timing Change )

राज्यातल्या चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्यात आली आहे. राज्य सरकारने शाळांची वेळ बदलण्या साठीचा सर्वात मोठा निर्णय घेतलाय. सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा आता सकाळी 9 वाजता भरणार आहे. सर्व माध्यमांच्या तसंच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी देखील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजल्यानंतर भरवण्याचे परिपत्रक राज्य शासनाने काढलंय. राज्यपालांनीही शाळेची वेळ बदलण्याची सूचना केली होती मुलांची झोप होत नसल्याने शाळांची वेळ बदलण्याची मागणी होत होतीच.. अखेर राज्य शासनाने चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे.  ( School Timing Change )

📣👉 कशा भरणार शाळा  शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करून पहा

शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनाचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात 5 डिसेंबर 2023 ला एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी भाषणादरम्यान राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रामधील शाळाच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केलली होती. आणि यावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्यामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी हा अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक, तसंच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. गुगल लिंक वरील अभिप्राय व विविध शिक्षण तज्ज्ञ तसंच शिक्षण प्रेमी आणि पालक यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. यात काही गोष्टी समोर आल्या. ( School Timing Change )

📣👉 कशा भरणार शाळा  शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करून पहा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360