Kunbi Cast Certificate: कुणबी प्रमाणपत्र कसं मिळवायचं, त्याची प्रोसेस घ्या जाणून

Kunbi Cast Certificate : कुणबी प्रमाणपत्र नक्की काढतात कसे? यासंदर्भात अजूनही संभ्रम आहे. कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईक म्हणजे तुमचे वडील/चुलते/आत्या, आजोबा,पणजोबा, खापर पणजोबा, वडिलांचे चुलते/आत्या, आजोबांचे चुलते/आत्या, पणजोबांचे चुलते/आत्या, खापर पणजोबांचे चुलते/आत्या यापैकी कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे.

Vanshavali: वंशावळ म्हणजे काय ? वंशावळ कशी काढायची ?

जातीचा पुरावा मिळवण्यासाठी काय कराल?
रक्तसंबंधातील नातेवाइकांचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून कुणबी नोंद आहे का? ते तपासा आणि.स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्ममृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक / गाव नमुना नं. १४ मध्ये ठेवली जात असे. पूर्वी या सर्व नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या.  व १ डिसेंबर १९६३ पासून कोतवाल पद महसूल विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले आहे. आपल्या रक्तनातेसंबंधातील नातेवाइकाचा जन्म / मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्याच्या नावाच्या गाव नमुना नं.१४ किंवा कोतवाल बुकाची नक्कल मागणी करावी लागते. त्यात कुणबी नोंद आहे का? हे तपासा Kunbi Cast Certificate

image search 1735828935081 अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी ४०,००० रिक्त जागा; परीक्षा न देता सरकारी नोकरीची संधी! अर्ज कसा कराल? पहा
अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी ४०,००० रिक्त जागा; परीक्षा न देता सरकारी नोकरीची संधी! अर्ज कसा कराल? पहा

Kunbi Cast Certificate

आपल्या कुळामधील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी(६ ड नोंदी), जमीन वाटप नोंदी, ७/१२ उतारे, ८अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, सातबारा अमलात येण्याआधी असणारे क. ड. ई. पत्र, सूडपत्र, खासरा पत्रक, हक्कपत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे का? हे शोधावे व असेल तर ते कागदपत्र काढून घ्यावेत. Kunbi Cast Certificate

1000391066 भुजबळांच्या मंत्रीमंडळ एंट्रीसाठी धनंजय मुंडेंची विकेट?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ उडाली
भुजबळांच्या मंत्रीमंडळ एंट्रीसाठी धनंजय मुंडेंची विकेट?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ उडाली

कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे का?
हे शोधावे व असेल तर ते कागदपत्र काढून घ्यावेत. रक्तसंबंधातील नातेवाइक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाइकाची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा घ्यावा.रक्तसंबंधातील नातेवाइकाने अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्याचे हे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा जातीचा पुरावा म्हणून चालेते.  Kunbi Cast Certificate

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360