Pm kisan 2024: राज्यातील ८७ लाखांवर शेतकऱ्यांना लाभ,केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना मिळणार असून या पोटी १९४३ कोटी ४६ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी ४ हजार रुपयांप्रमाणे ३७९२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे. ( Pm kisan 2024 )
हे पण वाचा- तर ठरलं! 28 फेब्रुवारी ला शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 6000 हजार रुपये जमा होणार ( PM Kisan Yojana 16th Installment )
यवतमाळ जिल्ह्यातील भरी येथे बुधवारी (दि. 28) एका विशेष समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वाटप होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच एकाच वेळी तीन हप्ते दिले जाणार असून, त्यासाठी आवश्यक ती व्यवस्था थेट पंतप्रधान कार्यालयातून करण्यात आलेली आहे. केंद्रीय कृषी विभाग आणि राज्य सरकारने संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत. ( Pm kisan 2024 )
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यामुळे राज्यातील 87 लाख 96 हजार शेतकऱ्यांना DBT द्वारे लाभ मिळणार आहे. पंधराव्या हप्त्याच्या तुलनेमध्ये २ लाख ३३ हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, या शेतकऱ्यांनी यशस्वीरित्या ई-केवायसी पूर्ण केलेले आहेत. ( Pm kisan 2024 )
हे पण वाचा तर ठरलं! 28 फेब्रुवारी ला शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 6000 हजार रुपये जमा होणार ( PM Kisan Yojana 16th Installment )
देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नमो शेतकरी महासन्मान निधीची घोषणा केलेली होती. आणि त्यानुसार पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यात नमो शेतकरी फेडरेशन फंडातून ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ( Pm kisan 2024 )
एक लाभ प्रदान करण्यात आला, आणि यासाठी 1712 कोटींची तरतूद करण्यात आली. सध्या, राज्य सरकारने दुसऱ्या हप्त्यासाठीचा निधी 1792 कोटी आणि तिसऱ्या हप्त्यासाठी 2000 कोटींचे वाटप अधिकृत केलेली आहेत. त्यामुळे हे ३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. Pm kisan 2024
शेतकऱ्यांची झाली दिवाळी पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये 27 फेब्रुवारीला जमा PM Kisan and Namo Shetkari Yojana
गावोगावी साजरा होणार किसान उत्सव दिवस Pm kisan 2024
२८ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिलेले आहे. त्यानुसार कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम सर यांनी कृषी विभागाच्या जिल्हा, आणि तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना हा दिवस पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहे. त्यानुसार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून गाव पातळीवर तसेच कृषी विज्ञान केंद्र सामाईक सुविधा केंद्र येथे पीएम किसान उत्सव दिवस साजरा केला जाणार आहे ( Pm kisan 2024 )