आताची मोठी बातमी: भारतात CAA (नागरिकत्व दुरुस्ती विधेयक) कायदा लागू

Centre notifies Citizenship Amendment Act rules
CAA Amendment Act : CAA म्हणजे काय ? पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या सहा समुदायांच्या (हिंदू, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध आणि पारशी) निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देणे हा नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याचा (सीएए) उद्देश आहे.

CAA नागरिकत्व दुरुस्ती विधेयकातील तरतुदीनुसार बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील बिगरमुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारसी धर्मीयांना भारतात १२ ऐवजी ६ वर्षे वास्तव्य केल्यानंतर आणि त्यांच्याकडे उचित कागदपत्रे नसली, तरी भारताचे नागरिकत्व मिळते.

खुशखबर! महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ; या कर्मचाऱ्यांना सरकारची नवीन भेट मंत्रिमंडळाचा निर्णय | DA Hike News

केंद्रामधील नरेंद्र मोदी सरकारने केलेला सुधारित नागरिकत्व कायदा अर्थात सिटीझनशिप अमेंडमेंट अॅक्ट (CAA). हा कायदा नेमका काय आहे? त्यात कोणत्या तरतुदी आहे. आणि त्यांच्या देशातील नागरिकांवर नेमका काय परिणाम होणार आहेत. याबाबतीत अनेकांना योग्य माहिती नाही आहे. तर आपनपपजाणून घेऊया Citizenship Amendment Act (CAA) अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा नेमका काय आहे?

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक नुकतेच संदसेत संमत करण्यात आलेले होते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झालेले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे भारतालगतच्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमध्ये असलेल्या मुस्लिमेत्तर अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत काय आहे भाजपाचे म्हणणे? तर मुस्लिमबहूल असलेल्या या देशांमध्ये धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशांमधून पलायन करावे लागत आहे, त्यांना भारतात आश्रय आणि नागरिकत्व मिळेल, अशा प्रकारचा दावा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायद्यातील 3 महत्त्वाच्या बाबी…

  1. कोणाला मिळणार नागरिकत्व : 31 डिसेंबर 2014 पूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातून धार्मिक छळामुळे भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील लोकांना नागरिकत्व दिले जाईल. या तीन देशांतील लोकच नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतील.
  2. भारतीय नागरिकांवर काय परिणाम होईल: CAA चा भारतीय नागरिकांशी काहीही संबंध नाही. भारतीय नागरिकांना संविधानानुसार नागरिकत्वाचा अधिकार आहे. सीएए किंवा कोणताही कायदा हे काढून टाकू शकत नाही.
  3. अर्ज कसा करावा: अर्ज ऑनलाइन करावा लागेल. तो भारतात कधी आला हे अर्जदाराला सांगावे लागेल. तुमच्याकडे पासपोर्ट किंवा इतर प्रवासी कागदपत्रे नसली तरीही तुम्ही येथे अर्ज करू शकता. या अंतर्गत भारतात राहण्याचा कालावधी ५ वर्षांपेक्षा जास्त ठेवण्यात आला आहे. उर्वरित परदेशी लोकांसाठी (मुस्लिम) हा कालावधी 11 वर्षांपेक्षा जास्त आहे.

पीएम मोदींच्या अधिसूचनेच्या मुद्द्यावरून अटकळ होती, पण तसे झाले नाही. अधिसूचनेपूर्वी, पंतप्रधानांनी सोशल मीडियावर अग्नि-5 क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल DRDO शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले

जर तुम्ही वरील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या धार्मिक समुदायाशी संबंधित असाल आणि 31 डिसेंबर 2014 पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तानमधून धार्मिक छळामुळे भारतात आला असाल, तर तुम्ही या कायद्यानुसार नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास पात्र असाल. तथापि, अधिकृत अधिसूचना आणि तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वांची प्रतीक्षा करणे चांगले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360