Lok Sabha Election 2024 Results विश्वसनीय सूत्रांनकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी 8 जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून त्याच दिवशी मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. राष्ट्रवादीला एक मंत्रिपद तर शिवसेनेला एक राज्यमंत्री आणि एक मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा आहे.
नरेंद्र मोदी ८ जून रोजी शपथ घेणार आहेत. ( परंतु पंतप्रधान पदाचा चेहरा बदलण्याची शक्यता )
नरेंद्र मोदी 8 जून रोजी दिल्लीत शपथ घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अजित पवार NDA बैठक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 आणि 8 जून रोजी दिल्लीत होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘एबीपी माझा’ला दिली आहे. सरकार स्थापनेसाठी एनडीएची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित होते.
ST महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी; 10वी पास करू शकतात,अर्ज प्रक्रिया पहा ST Bharti
मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत
एनडीएने लोकसभा निवडणुकीत 292 जागा जिंकून बहुमताचा टप्पा ओलांडला आहे, त्यामुळे ते लवकरच सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी 8 जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींचा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारला आहे. नरेंद्र मोदी सध्या काळजीवाहू पंतप्रधान आहेत.Lok Sabha Election 2024 Results
दिल्लीत एनडीएची बैठक
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बुधवारी दिल्लीत एनडीएची बैठक झाली. या बैठकीत सर्व एनडीए पक्षांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पाठिंब्याचे पत्र सादर केले. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ७ जून रोजी एनडीएच्या खासदारांच्या बैठकीनंतर सर्व मित्रपक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत.
नितीश आणि चंद्राबाबू नायडू यांनी NDN ला पाठिंब्याचे पत्र दिले
नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी NDN ला पाठिंब्याचे पत्र दिले आहे. एकनाथ शिंदे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या पक्षाला पाठिंब्याची पत्रे दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एनडीए लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता असल्याचे मोठे अपडेट समोर येत आहे. सर्वांचे सहकार्य व सह्या घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.Lok Sabha Election 2024 Results