Tur Bajarbhav Today गेल्या खरीप हंगामात भाव चांगला नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिके साठवून ठेवलेली आहेत. भाव वाढीच्या अपेक्षेने शेतमालाची साठवणूक करण्यात आली असून अनेक शेतकऱ्यांनी गेल्या हंगामातील तुरीचीही साठवणूक केली असून गेल्या काही महिन्यांपासून तुरीचे भाव स्थिर पहायला मिळत आहे. तुरीचा भाव 8 हजार ते 10 हजारांच्या दरम्यान असून, यंदा तुरीचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तवलेली जात आहेत.
आजच्या तुरीच्या बाजाराचा विचार केला तर गज्जर, हायब्रीड, लाल, स्थानिक, पांढरी तुरीची बाजारात प्रवेश झाली आहे. कारंजा, अकोट, अकोला, अमरावती, हिंगणघाट, मलकापूर या भागातून मोठ्या प्रमाणात आवक होत असून तुरीचा भाव 8 हजार ते 11 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल आहे.
आजच्या किमान व कमाल दराचा विचार करता लासलगाव बाजार समितीला राज्यात सर्वात कमी दर मिळाला असून तो केवळ 7000 रुपये प्रतिक्विंटल आहे. तर कारंजा बाजार समितीत सर्वाधिक सरासरी दर मिळाला. आज 11 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. येथे कमाल दर 12 हजार 155 रुपये होता. त्यामुळे आज येथे 500 क्विंटल तुरीची आवक झाली.Tur Bajarbhav