Weather forecast Maharashtra गेल्या २ दिवसांपासून राज्यातील कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात जोरदार ते मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबई आणि नवी मुंबई व पुणे तसेच सातारा मध्ये गेल्या तीन चार तासांत अती मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे सखल भागात पुरपरीस्थीती निर्माण झाली आहे. मुंबई मध्ये पावसाचा जोर पुढचे 4- 5 तास कायम राहणार असल्याचे होसाळीकर यांनी सांगितलेले आहे.
हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या ३-४ तासांत मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी, सांगली, हिंगोली, परभणी, लातूर सह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या तीन ते चार तासांत अति मुसळधार पावसाची शक्यता आहेऊ. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वहातूक कोंडी निर्माण होऊ शकते. तरी नागरिकांनी सतर्क रहावेत.
सध्या घाट भागात अती मुसळधार पाऊस पडतो आहे. थामिनी घाटातील सणसवाडी येथे गेल्या 24 तासांत 468 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहेत. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहेत.