Ladki Bahin Yojana Status: लाडकी बहिण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे मिळुन 3000 रूपये दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी वितरित केले जाणार आहेत. 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र महिलांना आधार लिंक केलेल्या बँक खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे DBT द्वारे टाकण्यात येणार आहेत. ज्या पात्र महिलांचे बँक खाते आधारशी लिंक झालेले नाहीत, त्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक करण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहेत.
लाडकी बहिण योजनेत आतापर्यंत 1 कोटी 35 लाख लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आलेली आहेत. या योजनेचे पैसे लाभार्थीच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा केले जाणार आहेत. अर्जदार पात्र लाभार्थ्यांपैकी 27 लाख लाभार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक केलेले नाहीत. ( Ladki Bahin Yojana Status )
आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव नसलेल्या महिलांना पैसे वितरण होणार नसल्याने या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक करण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात यावीत. तसेच योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहु नये याची प्रशासनाने दक्षता घ्यावीत. 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक करावेत, असे तटकरे यांनी सांगितलेले आहे.
PM विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना, महिलांना मिळणार 15000 रुपये Silai Machine Loan
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे पुढे म्हणाल्या आहेत कि, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 नसून अर्ज प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहेत. दि. 31 ऑगस्टनंतर योजनेत सहभागी होणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत. (Ladki Bahin Yojana Status)
लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज केलेल्या आणि त्यांचा आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक केलेले आहे. त्यांना 17 ऑगस्ट रोजी दोन हप्त्याचे मिळून 3000 रूपये जमा होणार आहेत. ज्या पात्र लाभार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक नाहीत. अशा महिलांना आधार क्रमांक त्यांच्या खात्याशी जोडल्यानंतर हे पैसे खात्यात पडणार आहेत. योजनेतून कोणताही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत.
17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी त्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लवकर लिंक करायचे आहेत, असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले आहेत.