Ladki Bahin Yojana Money Statusमहाराष्ट्रातील महिलांसाठी शिंदे सरकारने सुरु केलेल्या ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांना आता त्यांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे प्रत्येकी 5,500 रुपये जमा करण्यात येत आहे. योजनेचा लाभ मिळालेल्या महिलांना या योजनेचे पैसे महिलांना बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत.
Ladki Bahin Yojana Money Status
तथापि, अनेक महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे जवळपास 27 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. जर तुम्हाला अजूनही या योजनेचे पैसे मिळालेले नसतील, तर आजच तुमच्या मोबाईलवरून तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का? हे तपासून घ्या.
बँक खाते आधार कार्डशी लिंक कसे तपासायचे?
तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी https://uidai.gov.in या अधिकृत वेबसाईट लाभ भेट द्या. माय आधार या पर्यायावर क्लिक करावे, तुमचा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड टाकावे. रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकावा आणि ‘Bank Seeding Status’ या ऑप्शनवर क्लिक करावे. जर तुमच्या बँकेचे नाव दिसले, तर समजून जा की तुमचे खाते आधारशी लिंक आहे.
बँक खाते आधारशी लिंक नसल्यास काय करावे?
जर तुमचे खाते आधारशी लिंक नसलं, तर तुम्ही NPCI संकेतस्थळावर जाऊन लिंक करू शकतात. consumer या ऑप्शनवर क्लिक करावे, ‘Request For Aadhar Seeding’ वर क्लिक करायचे. तुमच्या बँकेचे नाव निवडून, खाते क्रमांक टाकावा आणि कॅपचा कोड भरून अर्ज सबमिट करावे. अशा प्रकारे, तुम्ही घरबसल्या तुमचे बँक खाते आधारशी लिंक करू शकतात.