Panjabrao Dakh Live Rain Alert: मराठवाड्यातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दि. 04 सप्टेंबर रोजी हवामानाचा नवीन अंदाज वर्तवलेला आहे. आज दिलेल्या नवीन अंदाजानं राज्यातील बहुतांश भागातील पावसाचा जोर ओसरला आहेत. तसेच सूर्यदर्शन झाले आहे. तसेच आज आणि उद्या पंजाबराव डख यांनी काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागातील पावसाचा जोर ओसरला असुन कडक सूर्यदर्शन झालेले आहे. तसेच पुढे सुद्धा 11 सप्टेंबर पर्यंत खुप मोठ्या पावसाचा अंदाज नसल्याचे डख यांनी सांगितले आहेत. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मुळे अनेक ठिकाणी शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे तरी शेतकऱ्यांना शासनाने लवकर मदत करावी अशी मागणी डख यांनी केलेली आहे.
रेशन कार्ड होणार बंद लवकर करा हे काम; केंद्र सरकारचा मोठा निर्णय! Ration card E-KYC Update
आज (05/सप्टेंबर) या भागात पावसाचा अंदाज कसा आहे
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार आज 04 सप्टेंबर रोजी सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच कोकण किनारपट्टी या जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा जोर असणार आहे.
उद्या दि 06/ सप्टेंबर ला पावसाचा जोर असेल – पंजाबराव डख
सोलापूर ,धाराशिव, बीड, लातूर, बुलढाणा, अकोला, वर्धा, नागपूर भंडारा या भागात पाऊस असेल.तसेच राज्यात 11 सप्टेंबर पर्यंत जोरदार व मोठ्या पावसाची शक्यता नाहीत तरी शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार पुढचे नियोजन करावेत.