Panjabrao Dakh Live:  आजपासून या भागात मुसळधार पावसाला सुरुवात – पंजाबराव डख

Panjabrao Dakh Live:  हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दि. 21 सप्टेंबर रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या अंदाजात त्यांनी शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आजपासून 02 ऑक्टोबर पर्यंत पाऊस सूरु राहणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज पाहुन पुढील नियोजन करावे असे डख यांनी म्हटलेलं आहे.

पंजाबराव डख यांनी आज दिलेल्या अंदाजात म्हटले की सध्या नांदेड, लातूर, बीड या भागात पावसाला सुरुवात झाली आहेत. आणि संध्याकाळ पर्यंत महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पाऊस सक्रिय होणार आहे. तसेच 02 ऑक्टोंबर पर्यंत पासून सुरू राहणार आहे तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी काढलेल्या पिकाला व्यवस्थित झाकून ठेवावे म्हणजे नुकसान होणार नाही असे डख यांनी सांगितलेले आहे.

राज्यातील अनेक धरणे जवळपास 100% भरलेले आहे आणि आता राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज आहे तरी धरणातील पाण्याचा विसर्ग होईन तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा डख यांनी दिला आहे. 21 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या कालावधीत अनेक ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचे पंजाबराव डख यांनी म्हटलेले आहे.

2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

01 सप्टेंबर, 02 सप्टेंबर रोजी राज्यात ज्याप्रमाणे पाऊस पडलेला होता.  तसाच पाऊस आजपासून 02 ऑक्टोबर या कालावधीत होण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी सतर्क रहावेत. 15 सप्टेंबर नंतर येणाऱ्या पावसात विजा आणि वारे अधिक प्रमाणात असले तरी विजा चमकत असताना झाडाखाली बसु नयेत असे पंजाबराव डख यांनी म्हटलेले आहेत.

पंजाबराव डख यांचा YouTube video येथे पहा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360