हवामान अंदाज ; मराठवाड्यातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 02/ऑक्टोंबर रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. सध्या सोयाबीन काढणी सुरू आहे आणि अशातच पंजाबराव डख यांनी पावसाचा इशारा दिला आहे. (Panjabrao dakh havaman live Hawaman)
पंजाबराव डख म्हणतात 07 ऑक्टोबर पर्यंत पाऊस राहणार आहे –
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार मराठवाडा आणि, विदर्भ, तसेच पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी या भागात 07 ऑक्टोंबर पर्यंत विखुरलेल्या स्वरूपात भाग बदलत पावसाची शक्यता अआ आहे. धाराशिव, नगर, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, पुणे, वाशिम, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात 07 ऑक्टोंबर पर्यंत पावसाचा जोर अधिक असणार आहे.
सोयाबीन काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांना वातावरण पाहून काढणीचे नियोजन करावेत असे डख यांनी सांगितले आहे. 07 ऑक्टोंबर पर्यंत विजेच्या कडकडाटासह भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल तरी शेतकऱ्यांनी सतर्क रहावेत.