मित्रांनो महाराष्ट्र सरकार द्वारे मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका पदाची अंगणवाडीमध्ये नवीन पदाची जाहिरात नुकतीच आलेली आहे. महिला व बालविकास विभागामार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहेत .या पदासाठी पदवीधर महिलांसाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे. या पदासाठी भरती झाल्यावर पगार किती मिळणार आहे? जागा किती, आहेत? फी किती आहे?, कागदपत्रे कोणती लागतात? या सर्व गोष्टींची माहिती आजच्या पोस्टमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे पर शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
महिला व बालविकास विभाग : अंगणवाडी भरती 2024 माहिती.
अंगणवाडी भरती जाहिरात 2024 – Anganwadi bharti maharashtra.
पदाचे नाव: मुख्य सेविका / पर्यवेक्षिका.
शैक्षणिक पात्रता: कोणती शाखेचे पदवीधर असणे आवश्यक.
एकूण पदे : 102 जागा
जाहिरात दिनांक: 14-10-2024
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3-11-2024
: लाडकी बहिण योजनेसाठी फक्त हे बॅंक खाते द्यावे लागणार!
वयाची अट :
खुल्या प्रवर्गासाठी – 21 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय उमेदवारांसाठी – 21 ते 43 वर्षे
खेळाडू, दिव्यांग, भूकंपग्रस्त, स्वातंत्र्य सैनिक पाल्यांना- 21 ते 45 वर्षे अशा प्रकारचे पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क :
जनरल कॅटेगरी -1000 रुपये
मागास प्रवर्गासाठी – 900 रुपये.
अर्ज करण्याची पध्द्त –
कम्प्युटर बेस ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे.
मुलाखत घेतली जाणार नाहीत.
परीक्षेचे स्वरूप कसे आहे?
वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न या परीक्षेत असणार आहे.
200 मार्कचे प्रश्न असणार आहेत आणि प्रश्न शंभर असणार आहे म्हणजे प्रत्येकी २ मार्काला १ प्रश्न असणार आहे.
हा पेपर सोडवण्यासाठी दीड तासाचा वेळ देण्यात आलेला आहे आणि दिव्यांगांसाठी दोन तासाचा वेळ आहेत .
वेतनमान (Pay Scale) : 35,400 ते 112400.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कोठे ही.
महत्वाची कागदपत्रे :
- अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
- वयाचा पुरावा आवश्यक
- शैक्षणिक अर्हता इत्यादिचा पुरावा आवश्यकउमेदवाराकडे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी जातीचा दाखला व इतर आपले प्रमाणपत्रे आहे.