Annpurna yojna Maharashtra: मोफत गॅस योजनेत मोठे बदल; फक्त याच महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार!

Annpurna yojna: राज्यभरातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि मुख्यमंत्री – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत दिले जाणार आहेत. सदर योजना मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना या नावाने राबविण्यात येते आहे. दि.30 ऑगस्ट 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची कार्यपध्दती निश्चित केलेली आहे.

सध्या काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत, यास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावीत, जेणेकरुन अन्नपूर्णा योजनेंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांना प्राप्त होईन. त्यामुळे मुळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्यात आलेले आहे.

लाडक्या बहिणींना खरंच मोबाईल गिफ्ट मिळणार का? पाहा तुम्हाला मिळणार का मोबाईल?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी दि. 01 जुलै 2024 पर्यंत शिधापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅसजोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅसजोडणी हस्तांतर केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरणार आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या मूळ शासन निर्णय दि. 30 ऑगस्ट 2024 मधील अन्य अटी व शर्ती व शासन शुध्दीपत्रक दि.04 सप्टेंबर 2024 मधील सुधारित तरतुदी कायम राहणार आहे. सदरील शासन निर्णय मा.मंत्रीमंडळाच्या दि.23 सप्टेंबर 2024 रोजीच्या बैठकीमधील निर्देशानुसार जारी करण्यात येत आहेत.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360