bandhkaam Kamgar Yojana : बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आली.! दिवाळीपूर्वी 5000 रुपये बोनस मिळणार!

bandhkaam Kamgar Yojana : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, विधानसभा निवडणुक जवळ आलेली की, सामान्य नागरिकांसाठी नवनवीन योजना ची पूर्तता केली जाते आहे. महाराष्ट्र राज्य सरकारआणि महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी 5000 रुपयांचे बोनस देण्यात येणार आहे अशी माहिती देखील देण्यात आलेली आहे.

राज्यांमधील 54 लाख 38 हजार 885 नोंदणीकृत बांधकाम कामगारांना येणाऱ्या दिवाळी अगोदर 5,000 रुपयांचे बोनस दिले जाणार आहे आहेत. (bandhkaam Kamgar Yojana) याविषयीचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये नुकताच घेण्यात आलेला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती निमंत्रक शंकर पुजारी यांच्या द्वारे देण्यात आलेला आहे.

शंकर पुजारी काय म्हटले आहे? (bandhkaam Kamgar Yojana)

ज्या बांधकाम कामगारांची नोंदणीकृत नोंद आहे. अशा बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी 5,000 हजार रुपयांचे बोनस हे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे जमा असलेल्या कामगार उपकारा अंतर्गत सुमारे 2719 कोटी 29 लाख रुपये देणार असल्याचे सांगितले जाते आहे.

image search 1735828935081 अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी ४०,००० रिक्त जागा; परीक्षा न देता सरकारी नोकरीची संधी! अर्ज कसा कराल? पहा
अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी ४०,००० रिक्त जागा; परीक्षा न देता सरकारी नोकरीची संधी! अर्ज कसा कराल? पहा

दिवाळीच्या अगोदर सर्व (bandhkaam Kamgar Yojana) बांधकाम कामगारांना हे बोनस मिळण्याची प्रमुख मागणी 8 ऑक्टोबर 2024 ला कृती समितीच्या माध्यमातून आझाद मैदानाद्वारे बांधकाम कामगार आंदोलनाच्या माध्यमातून केलेली होती. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी या संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करण्यात आलेली होती. तसेच बोनस देण्याबाबतच्या उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत प्राधान्य सचिवाला सुद्धा दिली होती.परंतु त्यावेळेस निर्णय करू अशा प्रकारचे आश्वासन शिष्टमंडळाद्वारे सिंगल यांना देण्यात आले होते.

या बांधकाम कामगारांना 5,000/- रुपये बोनस


आता महिन्यापूर्वी कामगार मंत्री सुरेश खाडे यांना नोंदणीकृत बांधकाम कामगारांना बोनस देण्याबाबतचा निर्णय करण्यात यावेत, असे निवेदन सुद्धा देण्यात आले होते. याविषयी सुद्धा विचार करू, अशा प्रकारचे आश्वासन कामगार मंत्री खाडे यांनी त्यावेळी दिलेले होते. तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे बोनस घोषित केले असून, मात्र याची अंमलबजावणी शासनाने केलेली नव्हती. न्यायालयीन प्रक्रियेच्या अंतर्गत 3 वर्षांपूर्वी बांधकाम कामगारांना शासनाने बोनस बाबत निर्णय करावा अशा प्रकारचे आदेश सुद्धा दिलेले होते.

या कामगारांना मिळणार लाभ

मंत्रिमंडळामध्ये झालेल्या बैठकीच्या दरम्यान कल्याणकारी मंडळातील नोंदणी सक्रिय बांधकाम कामगारांना रक्कम 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य (सानुग्रह अनुदान) यामध्ये जे जीवित आहेत अशी नोंद करण्यात आलेली आहे. अशा प्रकारच्या 28 लाख 73 हजार 568 तसेच मंडळाच्या संगणक प्रणालीवरून नोंदणी व नूतनीकरणाकरता प्राप्त करण्यात आलेल्या 25 लाख 65 हजार सतरा अशा एकूण 54 लाख 38 हजार पाचशे पंच्याऐंशी बांधकाम कामगारांना 5000 रुपयांच्या अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

1000391066 भुजबळांच्या मंत्रीमंडळ एंट्रीसाठी धनंजय मुंडेंची विकेट?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ उडाली
भुजबळांच्या मंत्रीमंडळ एंट्रीसाठी धनंजय मुंडेंची विकेट?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ उडाली

बांधकाम कामगाराची उद्दिष्टे

  • नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 5000 रुपये अर्थसाह्य दिवाळीपूर्वी बोनस देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहेत. नुकतीच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय पारित करण्यात आलेला आहे.या निर्णयामुळे सामान्य कामगारांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे.
  • बांधकाम कामगारांचे आर्थिक स्थैर्य सुधारावे तसेच वाढत्या महागाई मध्ये त्यांना अर्थसहाय्य प्राप्त व्हावे या उद्देशाने सरकारकडून बांधकाम कामगारांकरिता 5 हजार रुपयांचे आर्थिक बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
  • महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती नियंत्रक यांच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात आलेला असून दिवाळीपूर्वी बांधकाम कामगारांना मोठा लाभ मिळणार आहेत.
  • ज्या बांधकाम कामगाराची नोंद पूर्ण झालेली आहेत. अशा बांधकाम कामगारांना हा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.
  • दिवाळीपूर्वी बांधकाम कामगारांना 5000 बोनस मिळत असल्यामुळे येणारी दिवाळी गोड होणार आहेत.

अधिकृत वेबसाईट https://mahabocw.in/mr/

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360