Bank Account: बॅंक खाते आधार लिंक; सध्या लाडकी बहिण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु लाखो महिलांचे पैसे अर्ज मंजूर असताना आले नाही. आतापर्यंत अर्ज केलेल्या महिलांपैकी 27 लाख महिलांच्या बॅंक खात्याला आधार लिंक नसल्याची माहिती समोर येत आहे. आधार लिंक नसल्याने या महिलांना लाडकी बहिण योजनेचे 2 हप्त्याचे मिळून 3,000 रुपये मिळालेले नाहीत.
Bank Account
ज्या महिलांचे बॅंक खात्याला आधार लिंक नाहीत त्या महिलांना आधार लिंक केल्यानंतर या 2 हप्त्याचा लाभ मिळेल असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. दि. 5 सप्टेंबर 2024 पर्यंत 2 हप्ते तुमच्या बॅंक खात्यात जमा होतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे.
लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत काय करावे? मंत्री आदिती तटकरे
तुमच्या बॅंक खात्याला आधार लिंक आहे का? चेक करा लिंक नसेल तर लवकर बॅंक खात्याला आधार लिंक करावेत किंवा पोस्ट बॅंकेत खाते उघडा पोस्ट बॅंकेत खाते उघडल्यावर २-३ दिवसात तुमच्या बॅंक खात्याला आधार लिंक होईन.
बॅंक खात्याला आधार लिंक कसे करावेत Bank Account Link
बॅंक खात्याला आधार लिंक करण्यासाठी तुमच्या बॅंक शाखेत जाऊन एक फॉर्म भरून द्यावे. त्यासोबत तुमचे आधार कार्ड आणि पासपोर्ट फोटो जोडुन तुम्ही तुमच्या बॅंक खात्याला आधार लिंक करु शकतात. बॅंकेत अर्ज दाखल केल्यानंतर बॅंकेच्या नियमानुसार तुमच्या बॅंक खात्याला आधार लिंक होण्यासाठी साधारणतः आठवडाभराचा कालावधी लागतो आहे.
सध्या बॅंकेत लाडकी बहिण योजनेचे पैसे न जमा झालेल्या महिलांचे आधार लिंक करण्याची मोहीम सध्या सुरू आहे. त्यामुळे बॅंकेत महिलांची मोठी गर्दी पहायला मिळत आहेत.