Cotton Market News 2024: भविष्यात कापसाचे भाव वाढतील का? आणि जर वाढले तर किती वाढतील? सध्या सर्व कापूस उत्पादक शेतकरी हे आपला कापूस विकायचा की घरामध्ये साठवून ठेवायचे याचा विचार करत आहेत. त्यामुळे अशा प्रश्नांची उत्तरे या लेखात आपण पाहणार आहोत. तसेच तज्ञांचे सध्या काय मत आहे. याविषयी सर्व सविस्तर माहिती पाहत आहोत.
2021 22 मध्ये कापसाचा भाव 10 ते 12 हजारांच्या दरम्यान पोहोचलेला होता. आणि तो शेवटपर्यंत देखील कायम राहिलेला होता. मागच्या वर्षी 2022 23 मध्ये देखील 8500 ते 9800 रुपयांपर्यंत पाऊस कापसाची किंमत पोहोचलेली होती. परंतु हळूहळू कापसाचा भाव हा 7500 रुपयावर कमी होऊन फिरवलेला होता. परिणामी एप्रिल मे पर्यंत भाव वाढीच्या आशेने कापूस साठवून ठेवलेल्या असंख्य शेतकऱ्यांना देखील कापूस हा 7000 ते 7800 रुपये दराने शेवटी विकावा लागलेला होता.
गेलेल्या वर्षापासून घसरलेले कापसाचे भाव आता वाढण्यास सध्या तयार दिसत नाहीत. भाव बसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीचा कापूस आतापर्यंत साठवून ठेवलेले काही उदाहरणे देखील पाहायला मिळतात. तसेच यंदा 6500 ते 7500 या भावाने कापूस विकला जात आहे.
हे पण महत्त्वाचं आहे 👉 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Mahatma Fule Karj Mafi Yojna)
कापसाचे भाव कधी वाढतील?
भविष्यामध्ये कापसाचे भाव नक्कीच वाढू शकतील या साठी अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरामध्ये साठवून ठेवलेला आहे. मात्र यंदा कापसाचा कारण की आगामी काळामध्ये कापसाला 7000 ते 7600 रुपयांच्या जवळपास भाव मिळण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवलेल्या आहे. जे की सुमारे 400 ते 500 रुपयांनी अजून देखील वाढवू शकते. अशा प्रकारची माहिती देखील सांगण्यात आलेले आहे. कापसाचे पुरवठा वाढला असल्यामुळे चांगल्या कापसाच्या दरात घट झाल्याचा अनुभव सध्या बाजारामध्ये येत आहे. याचे महत्त्वाचे कारण अशी की शेतकरी आपला भिजलेला काळात झालेला कापूस घरी ठेवणे ऐवजी सध्या विकणे पसंद करताना पाहायला मिळत आहे. आणि यासाठी हवा देखील प्रचंड लक्षणीय पाहायला मिळते आहे.
कापूस विकावा की घरामध्ये साठवून ठेवावा?
कापसाच्या भावात शंभर टक्के वाढ होईलच याबाबत सध्या कोणालाच सांगता येणार नाही. मात्र यापेक्षा भाव कमी होणार नाहीत हे मात्र नक्की. कारण भाव यापेक्षा खाली येणार नाहीतर पुढील काळामध्ये उत्पादनाचा अचूक अंदाज तसेच आयात निर्यात धोरण आंतरराष्ट्रीय बाजार कापसाचा यावर परिणाम होऊन कापसाचा भाव वाढू शकतो.
बाजार भाव तज्ञांच्या मते यंदा कापसाच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात ची शक्यताही कमी दिसत आहे. तसेच पुढील काळामध्ये 600 ते 800 रुपयांची तेजी येऊ शकते. तसेच शेतकऱ्यांनी सात हजार रुपयांपेक्षा कमी दराने कापसाचे विक्री करू नये अशा प्रकारची माहिती देखील देण्यात आलेली आहे.