Crop Insurance | महाराष्ट्रातील 65 हजार शेतकऱ्यांना मिळणार 99 कोटींची मदत महिन्यातच मदतीचा निधी मंजूर; सविस्तर वाचा

Crop Insurance: नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळ पिकांच्या नुकसानीसाठी जिल्ह्यातील तब्बल ६५ हजार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने ९९ कोटी ७८ लाखाचा निधी मंजूर केलेला आहे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांच्या नुकसानीसाठी जिल्ह्यातील तब्बल ६५ हजार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने ९९ कोटी ७८ लाखाचा निधी मंजूर केला आहे.

येत्या काही दिवसांतच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल.

मागील वर्षी पावसाने दडी मारल्याने खरिपाचे अब्जावधी ₹ नुकसान झाले. मात्र, त्याची कुठलीही भरपाई अजून मिळालेली नाही.

थोड्याफार पाण्यावर घेतलेले पिके २७ नोव्हेंबरला आलेल्या अवकाळी व गारपिटीमुळे भुईसपाट झाली होती. कृषी विभागाने या नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे.

त्यात ३२ हजार ८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याच म्हटले होते. अंतिम अहवालानंतर ३५ हजार ९५२ बाधित हेक्टरवरील नुकसान मदतीसाठी पात्र ठरली आहेत.

पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता मिळणार हेक्टरी 18,900 रुपये, यादीत नाव पहा..! ( Pik Vima Yadi 2023 )

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

सर्वाधिक नुकसान द्राक्ष पंढरीत झाले. सुमारे ११ हजार ५९७ हेक्टर द्राक्षबागांचे कोट्यवधींचे नुकसान झाले, तर साडेदहा हजार हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले.

जिल्ह्यातील ८९८ गावांतील ६७ हजार ८६९ शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला.यातील ६५ हजार ८४० बाधित शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले.

काढणीवर आलेल्या दहा हजार ५९५ हेक्टरवरील नवीन लाल कांद्याचे तर ५८६ हेक्टरवरील कांदा रोपांचे नुकसान झाले. भात (६,७२९ हेक्टर), गहू (५७८),

टोमॅटो (२१०)भाजीपाला व इतर (१,७५५), मका (२६९) व उसाचे (२२१ हेक्टर) नुकसान झाले. ३४ हेक्टरवरील डाळिंब बागांनाही फटका बसला.

निफाड तालुक्यात नऊ हजार २९४ हेक्टरवरील, बागलाण तालुक्यात (५७० हेक्टर), नांदगाव (३,२५३), कळवण (७७३), दिंडोरी (२,९६४), सुरगाणा (२२५),

नाशिक (८६८), त्र्यंबकेश्वर (२२८), पेठ (५५६), इगतपुरी (५,९२०), सिन्नर (३७), चांदवड (७,५७७), येवला तालुक्यात (५६५) पिकांचे नुकसान झाले. कृषी विभागाने अंतिम अहवाल शासनाला पाठविला होता. त्यानुसार निधी मंजूर झाला आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

➡️➡️महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा⬅️⬅️

शासनाने नोव्हेंबरमधील नुकसानीसाठी सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत दिली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून ही मदत वितरित होईल.

जिल्हाधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची माहिती संगणकीय प्रणालीवर भरून हा संपूर्ण निधी वितरित करायचा आहे. नैसर्गिक आपत्ती निधीमधून बँकांनी कर्ज खात्यात किंवा इतर वसुलीसाठी एक रुपयाही वसुली करू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

या निर्णयानुसार नाशिक विभागासाठी १ लाख ७ हजार ४९५ बाधित शेतकऱ्यांसाठी १४५ कोटी,दहा लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

यात सर्वाधिक निधी नाशिक जिल्ह्यातील ६५ हजार ८४९ शेतकऱ्यांना ९९ कोटी ७८ लाखाचा मंजूर झाला आहे. त्या खालोखाल नगर जिल्ह्यातील २३ हजार ७८३ शेतकऱ्यांना २९ कोटी ३७ लाखांचा निधी मिळणार आहे.

➡️➡️सर्व नवीन अपडेट पहा फक्त एका क्लिकवर⬅️⬅️

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360