Devendra Fadanvis Farmer Big Announcement: नमस्कार मित्रांनो, विधानसभा निवडणुक 2024 साठी सध्या सर्वच पक्षाकडून जाहीर सभा घेतल्या जात आहे. महायुती म्हणजे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 10 मोठ्या घोषणा केलेल्या आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असलेली कर्जमाफी नवीन सरकार आल्यावर करणार असे जाहीर सभेत फडणवीस यांनी सांगितलेलं आहे.
महायुतीने केलेल्या जाहीरनाम्यात 10 घोषणा पुढीलप्रमाणे आहेत
फडणवीस यांनी सांगितले की नवीन सरकार स्थापन केल्यावर 100% कर्जमाफी करण्यात येणार आहे.
- मित्रांनो, लाडक्या बहिणीना 1500 रुपयावरुन दर महिन्याला 2100 रुपये देण्याचे तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन दिले आहे
- शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून दरवर्षाला 15,000 रुपये देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान देण्याचे आश्वासन देखील दिले आहे.
- प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन दिलेले आहे.
- वृद्ध पेन्शन धारकांना रु.2100 महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे वचन सुध्दा जाहीर केले आहे.
- जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन ही देण्यात आलेलं आहे.
- 25 लाख रोजगार निमिर्ती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये प्रशिक्षणातून महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन देण्याचे वचन ही फडणवीस साहेबांनी दिलं आहे.
- 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधणार राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे आश्वासन दिले आहे.
- अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15000 रुपये आणि सुरक्षा कवच महिन्याला 15,000 रुपये वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन सुध्दा जाहीर केले आहे.
- वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन दिले आहे.
- सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन दिले आहे.
वरीलप्रमाणे महायुती सरकारने केलेल्या घोषणा आहे.
तसेच फडणवीस यांनी सांगितले की नवीन सरकार स्थापन केल्यावर 100% कर्जमाफी करण्यात करण्यात येणार आहे.