लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय; येथे पहा नवीन निर्णय

Ladki Bahin Yojana | महायुती सरकारचा काल 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडलेला आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या आहेत. शपथविधी होताच मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली आहेत. (Ladki Bahin Yojana)

या बैठकीमध्ये काय मोठे निर्णय होणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडलेली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी सरकारच्या भूमिकेबद्दल माहिती दिली आहे. आमची पदं बदलली असली तरी देखील काम करण्याची दिशा बदलणार नाही, असं फडणवीस म्हणालेले. तसेच, राज्य सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहिण योजना यापुढेही सुरु राहणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

लाडकी बहीण योजना पुढील हप्ता 1500 की 2100 येणार आणि कधी येणार; महिलांना मोठे गिफ्ट!

लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार?

यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील पत्रकार परिषद झालेली आहे. यात त्यांनी ‘लाडकी बहीण योजने’बाबत माहिती दिली. राज्याच्या अंतरीम अर्थसंकल्पामध्ये अजित पवार यांनी लाडकी बहीण योजेनेची घोषणा केलेली होती. या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी 2100 देण्याची घोषणा केलेली होती. आता महायुतीचा शपथविधी पार पडला आहे. त्यामुळे सरकार या घोषणेबाबत पुढे काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

eVH9OIx3Qwo HD मोबाईल चे रिचार्ज प्लॅन स्वस्त होणार? मोबाईल धारकांसाठी आनंदाची बातमी, TRAI चे नवीन नियम जाहीर
मोबाईल चे रिचार्ज प्लॅन स्वस्त होणार? मोबाईल धारकांसाठी आनंदाची बातमी, TRAI चे नवीन नियम जाहीर

यासंबंधी प्रश्न केला असता एकनाथ शिंदे म्हणालेले आहे की, नुकतीच मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना लाडकी बहीण योजनेबाबत सूचना केल्या आहे. तातडीनं डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला पाहिजे अशा सूचना आम्ही दिल्या असल्याचं एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत. (Ladki Bahin Yojana)

प्रचंड वेगाने चक्रीवादळ येणार; महाराष्ट्रात काय परिस्थिती राहणार, या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होणार

‘त्या’ घोषणा महायुती पूर्ण करणार?

मी पूर्वी जेव्हा सीएम होता तेव्हा मी स्वत:ला मुख्यमंत्री नाही तर सीएम म्हणजे कॉमन मॅन समजायचो, आता उपमुख्यमंत्री आहे तर मी आता स्वत: डीसीएम अर्थात डेडिकेटेड कॉमन मॅन समजतो असंही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत. (Ladki Bahin Yojana)

दरम्यान, महायुतीने निवडणुकीपूर्वी अनेक घोषणांचा पाऊस पाडलेला होता. त्यात शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 12 हजार वरुन 15 हजार वाढ, वृद्ध पेन्शन धारकांना 1500 वरुन 2100 रुपये दिले जाणार, 25 लाख रोजगार निर्मिती, वीज बिलात 30 टक्के कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार अशा अनेक घोषणा करण्यात आलेल्या होत्या. आता या घोषणांची अंमलबजावणी कधी होईल, त्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहेत.

Majhi kanya Bhagyashree Yojna Online Apply
मुलींना मिळणार 50 हजार रुपये, येथे अर्ज करा; माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाईन अर्ज सुरू

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360