नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुढील 5 वर्षांचा खुलासा म्हणाले, आता सामना हा…

Devendra Fadnavis l राज्यात देवेंद्र पर्वाला सुरवात झालेली आहे. कारण काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र आता फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस पूर्ण फॉर्ममध्ये आहेत. फडणवीस यांनी परवा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांसोबत संवाद देखील साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी त्यांची पुढील पाच वर्षाची रणनीती नेमकी काय असणार हे स्पष्ट केलं आहे.

पुढील पाच वर्षांची रणनीती काय असेल?

गेल्या कार्यकाळात आम्ही शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यासोबत 50 षटकांचे सामने खेळलो, तर अजितदादा पवार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही टी-20 खेळलोय, मात्र आता आम्हाला कसोटी सामना खेळायचा आहे. म्हणजे पाच वर्षांची दीर्घ खेळी होईल. तसेच ज्यामध्ये आमच्या इच्छेनुसार क्षेत्ररक्षणाची देखील व्यवस्था करू. विधानसभा निवडणुकीत तब्बल 132 आमदार निवडणून आणत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला राज्यात सगळ्यात मोठा पक्ष बनवलेला आहे. मात्र आता त्यांची नवी इनिंग सुरु झाली आहे. तसेच आता शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार हा नागपूर अधिवेशनाच्या आधी होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहेत.

eVH9OIx3Qwo HD मोबाईल चे रिचार्ज प्लॅन स्वस्त होणार? मोबाईल धारकांसाठी आनंदाची बातमी, TRAI चे नवीन नियम जाहीर
मोबाईल चे रिचार्ज प्लॅन स्वस्त होणार? मोबाईल धारकांसाठी आनंदाची बातमी, TRAI चे नवीन नियम जाहीर

परंतु, राज्यातील महत्त्वाच्या खात्यांवर आपले प्रतिनिधी नेमणार असल्याचे देखील त्यांनी म्हटलेले आहे. शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रालयाची मागणी केली आहे. मात्र ती देवेंद्र फडणवीस यांना स्वतःकडे ठेवायचे आहे. याशिवाय त्यांनी उद्योग, महसूल, पाटबंधारे, नगरविकास, सामाजिक न्याय मंत्रालय ही खाती देखील मागितली आहे. परंतु, या खात्यांवर राष्ट्रवादीने देखील दावा केलेला आहे.

लाडकी बहीण योजना; घरात या 7 वस्तू असतील, तर महिलांना 6 वा हप्ता मिळणार नाही. नवीन नियम पहा

Devendra Fadnavis l देवेंद्र फडणवीसांपुढे नेमकी कोणती आव्हानं?

देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जायचे आहे. यावेळी त्यांना सर्वात आधी निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करायची आहेत. त्यासाठी त्यांना तब्बल 7.82 लाख कोटी रुपयांचा निधी लागणार आहेत.

Majhi kanya Bhagyashree Yojna Online Apply
मुलींना मिळणार 50 हजार रुपये, येथे अर्ज करा; माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाईन अर्ज सुरू

याशिवाय दुसरं सर्वात मोठं आव्हान म्हणजे मराठा आरक्षण. कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील त्यांना मार्गी लावावा लागणार आहेउ. तसेच तीन पक्षाचे सरकार असल्याने समन्वय राखून सगळे निर्णय देखील त्यांना घ्यावे लागणार आहे. कारण मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झालेले एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समाधानी ठेवणे फडणवीसांसाठी सोपे नाही.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360