आजोबांनी विद्यार्थ्यांसमोर इंग्रजी झाडलं कि, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल चकित, कोल्हापूरच्या आजोबांनी केली कमाल…

Elder man speaks in english video: गेल्या अनेक काळापासून इंग्रजी भाषेचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलेलं असल्याचे पहायला मिळत आहे. आधी फक्त आर्थिक परिस्थिती चांगली असणाऱ्या पालकांची मुलं इंग्रजी शाळेत जात होते. पण आता सगळेच इंग्रजी शाळेत शिकू लागलेले आहे. आधी इतक्या सोयी-सुविधा नव्हत्या पण आता थोड्या थोड्या अंतरावर इंग्रजी शाळा आहेत, क्लासेसही आहे.

आताची मुलं ज्याप्रकारे इंग्रजी बोलतात तसंच एखाद्या गावाकडील आजोबांनी इंग्रजीमध्ये संवाद केला तर तुम्हालाही आश्चर्य वाटेलच ना. सध्या असाच प्रकार एका ठिकाणी घडलं आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय, यात एका आजोबांनी इंग्रजीमध्ये आपली ओळख करून दिली आणि त्यांच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे.

आजोबांचं इंग्रजी जगात भारी

1000400189 मोठी बातमी : महाराष्ट्रात HMPV विषाणूचा शिरकाव: नवीन रुग्ण आढळले
मोठी बातमी : महाराष्ट्रात HMPV विषाणूचा शिरकाव: नवीन रुग्ण आढळले

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आजोबांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आलेला आहेत. या व्हिडीओमध्ये एक आजोबा काही विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना दिसलेले आहे. पण ते मराठीतून न बोलता इंग्रजीमधून त्यांच्याशी संवाद साधत होते. शर्ट पॅन्ट आणि डोक्यावर सफेद टोपी असा पेहराव असलेले हे आजोबा चक्क इंग्रजीमध्ये बोलायला लागलेले हे ऐकताच सगळेच चकित झालेले आहेत.

सुरूवातीला त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली आहे. मग त्यांनी ते इंडियन आर्मीमध्ये होते असा उल्लेख देखील केला आहे. आता मी इथे फिरण्यासाठी आलो आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या शिक्षणाविषयी थोडी माहिती दिली आहे. धाडधाड इंग्रजी बोलून झाल्यावर आजोंबानी विद्यार्थ्यांना कसं वाटलं माझं इंग्रजी असाही प्रश्न विचारलेला आहे.

आजोबांचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ @all_dyp_family_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “शिक्षण घे भावा ते कधीचं तुला उपाशी पोटी झोपू देणार नाहीत..” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलेली आहे.

पुढे या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, “आपल्या कॅालेज मध्ये हे काका आले होते त्यावेक्ळी त्यांना सहज विचारलं व की
ही मुलं त्यांना अशिक्षित आहेत म्हणून काही तरी म्हटलेले त्यावेळी त्यांनी त्यांचा परीचय करून दिला -कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालूका आणि त्यात बस्तरवाड हे गाव व अर्जुन कोळी त्यांचं नाव” तर पुढे “शिक्षण हे वाघीणीचं दुध आहेत जो कोणी पिणार तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाहीत..!” असंही लिहण्यात आलेले आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २.४ मिलियन व्ह्यूज आले आहे.

PM Kisan Yojna Payment
तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या यादीत नाव पहा! PM Kisan Status

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360