Free Sarees in Ration Shops : रेशनकार्ड असणाऱ्यांना अन्नधान्याबरोबरच साडी शासन आता देणार आहेत. अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटूंबानाच मात्र याचा लाभ मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या शासन निर्णयाचा महाराष्ट्रातील सर्व तालुक्यामधील 10 हजार 500 कुटूंबियांना लाभ होणार आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार या साड्या वाटप करणार असून सर्व तालुक्यामधील साडी वाटपाचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांच्या उपस्थितीत करण्यात आलेला आहे. महायुती सरकारने कॅप्टीव्ह योजनेंतर्गत साड़ी वाटप करण्याची योजना सुरु केलेली आहेत.
SBI बँक दरमहा 60 हजार ₹ कमवण्याची देत आहे, मोठी संधी; या योजने बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती ( SBI Scheme)
लोणी बुद्रुक या ठिकाणी याचा प्रारंभ शालिनी विखे यांच्या उपस्थितीत करण्यात आलेला आहेत. याप्रसंगी प्रातिनिधीक स्वरुपात महिलांना साडीचे वितरण करण्यात आलेलेअसून आता राज्य शासनाच्या वतीने तालुक्यातील महिलांना आता रेशन दुकानामधून साडी उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. याप्रसंगी सरपंच कल्पना मैड, सुचित्रा विखे, आशा कडलग, गणेश विखे, माजी सिनेट सदस्य अनिल विखे, माजी सरपंच लक्ष्मण यासह बनसोडे, नानासाहेब म्हस्के यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये ( SBI Mudra loan )
शालिनी विखे म्हणाल्या, राज्य शासनाच्या माध्यमातुन सामान्य नागरिकांसाठी सुरु असलेल्या योजनांचा लाभ होत आहेत. शासनाने याआधी अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटूंबांना आनंदाचा शिधा देखील दिलेला आहे. वर्षभरातील चैत्रपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती व दिवाळी सणानिमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी १०० रुपयात आनंदाचा शिधा उपलब्ध करुन दिलेला आहे. या शिधापत्रिका धारकांना आता सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने एक साडी दरवर्षी भेट देण्याचा निर्णय केलेला आहे. त्याची अंमलबजावणी सुरु केलेली आहे.